DHULE | जिल्हा परिषदेतील अपहार प्रकरणातील भास्कर वाघची मालमत्ता होणार सरकार जमा
Автор: Loknayak News (लोकनायक न्युज)
Загружено: 2023-12-18
Просмотров: 15205
Описание:
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @loknayaknews
#dhulenews #dhulelivenews #dhuletopenews #dhulezp #bhaskarwagh #crime_news #dhulepolice #dhulecourt #supremecourt
DHULE | धुळे जिल्हा परिषदेतील अपहारकांड ; वादग्रस्त भास्कर वाघची मालमत्ता ३४ वर्षांनी होणार सरकार जमा
ANC : धुळे जिल्हा परिषदेत झालेल्या निधी अपहारातील आरोपी भास्कर वाघची मालमत्ता ३४ वर्षांनी सरकार जमा करण्याचा आदेश शासनाने केला आहे. सर्वोच्च न्यायालयात सदर प्रकरणी विधी व न्याय विभाग व महसूल व वन विभागाने दिलेले अभिप्राय तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने सदर प्रकरणी आरोपी लोकसेवक भास्कर वाघ विरुध्द दाखल अपसंपदेच्या गुन्ह्यातील गोठविण्यात आलेली स्थावर मालमत्ता सरकार जमा करण्याच्या हेतूने शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी धुळे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच संबंधितांची स्थावर मालमत्ता वगळता इतर जंगम मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
भास्कर वाघ हा जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचा रोखपाल होता. धनादेशावर कार्यकारी अभियंत्याची सही झाल्यावर तो धनादेशावरील रक्कम वाढवत असे. १९७५ ते ९० दरम्यान या पद्धतीने कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला होता. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांच्या काळात हा अपहार समोर आला होता. या घोटाळ्यात ७७ आरोपींविरुद्ध १५ कोटी ८२ लाखांचा अपहार केल्याचे १४ गुन्हे नोंदवले गेले. जन्मठेपेची शिक्षा झालेला भास्कर वाघ अजूनही शिक्षा भोगत आहे. धुळे सत्र न्यायालयाच्या २००३ च्या निकालाविरोधात त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने शिक्षा कायम केली होती. या निकाला विरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात २००18 मध्ये दाद मागितली. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही त्याची शिक्षा कायम केली. खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत वाघ याची संपत्ती जप्त करणे प्रलंबित होते. वाघ याच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हस्तगत केले होते. १७ लाख ३६ हजार रुपयांच्या दागिन्यांचा ऑक्टोबर महिन्यात लिलाव झाला होता.
१९९० मध्ये शासकीय निधी अपहार प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यातील आरोपीची मालमत्ता सरकारजमा होण्यास ३५ वर्षांचा कालावधी लागला. सन १९९० च्या दशकात राज्यभर गाजलेल्या धुळे जिल्हा परिषद निधी अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार भास्कर शंकर वाघ व त्याची पत्नी मंगला वाघ या दोघांची स्थावर व जंगम मालमत्ता लवकरच सरकार जमा होणार असे आदेश गृह विभागाने काढले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपी भास्कर वाघ याच्या मालमत्तेचे मूल्य ११ लाख ३९ हजार इतके आहे.
BYTE : ऍड एस बी देवकर, विशेष सरकारी वकील
#लोकनायक #loknayaknews #लोकनायक_न्युज #loknayak_news
#newsmaharashtra #bjp #shivsena #marathinews #fatafatnews #dailynews #newsupdates
#topnews #mahavikasaghadi #latestmarathinews #ncp #congress #shivsena #news #latestnews
#breakingnews #trendingnews
#marathinewsupdates #marathibatmya
#nationalnews #mns #localnews
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | लोकनायक न्युज | Loknayak News | Loknayaknews
marathi live news, marathi news, mumbai news, Live TV, मराठी बातम्या, ऑनलाईन बातम्या, marathi online news, maharashtra politics, latest marathi news, maharashtra breaking news, NCP, Shivsena, मराठी, marathi, marathi news, marathi news live, todays marathi news, Maharashtra political news, national news in marathi, marathi batmya, sharad pawar, ajit pawar, devendra fadnavis, uddhav thackeray, maharashtra politics, raj thackeray, marathi batmya, marathi batmya live, latest marathi news, marathi news video, latest news, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: