scnnews... टी एस दिघोळे शैक्षणिक संकुलातून तीन सुवर्णपदक विजेते देश पातळीवर..
Автор: SCN News - सिन्नरकरांचा आवाज
Загружено: 2025-11-03
Просмотров: 1302
Описание:
scnnews... टी एस दिघोळे शैक्षणिक संकुलातून तीन सुवर्णपदक विजेते देश पातळीवर... नायगाव येथील संकुलात सर्वांचा सन्मान व सत्कार
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येच खेळाचे खरे कौशल्य असते, त्यांना योग्य संधी आणि वाव मिळाल्यास ते नक्कीच देश अन् राज्य पातळीवर यशस्वी होतात असे गौरवोदगार माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी काढले .ते नायगाव येथील टी एस दिघोळे शैक्षणिक संकुलात आयोजित युवा आशियाई कब्बडी स्पर्धेत सुवर्णपदक विजेता आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्रसाद दिघोळे ,प्रो कबड्डी खेळाडू श्रीधर कदम ,व मलेशिया येथील एशियन बीच रस्सीखेच स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या प्रणव दिघोळे ,व कृष्णा लोहकरे ,प्रतीक्षा जेजुरकर (मुंबई पोलीस) यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड हे होते ..कोंडाजी मामा आव्हाड यांनी सांगितले की सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने गावाला अन् शाळेला अभिमान वाटतो एखादा विद्यार्थी जिल्हा किंवा राज्य पातळीपर्यंत गेला तरी त्याचे फार अप्रूप वाटते नायगाव सारख्या ग्रामीण भागातील टी एस दिघोळे शैक्षणिक संकुलातून तीन-तीन विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवले याचा खऱ्या अर्थाने आनंद होतो निश्चितच त्यांना घडवणारे त्यांचे गुरुजन, मार्गदर्शक अन् या खेळाडूंचे जिद्द व परिश्रम याचे फलित म्हणजे सुवर्णपदक आहे...या विद्यार्थ्यांचे अनुकरण करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खेळात व स्पर्धा परीक्षेत यश संपादन करा..तसेच ग्रामीण भागातील मुलांना अनेक अडचणींना तोंड देत वाटचाल करावी लागते.तरी देखील ते संघर्ष करत यशस्वी होतात... या प्रसंगी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे सरचिटणीस हेमंत (आप्पा ) धात्रक यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालेल्या तीनही विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच टी एस दिघोळे शैक्षणिक संकुलातून तीन सुवर्णपदक विजेते देश पातळीवर आपल्या गावाचे तालुक्याचे नाव यशस्वी करत आहेत त्याबद्दल त्यांनी विद्यालय प्रशासनाचे कौतुक केलं. तसेच हल्लीच्या काळात सोशल मीडियामुळे तरुण वर्ग मोबाईलच्या संपर्कात जास्त असतो परंतु ग्रामीण भागातील तरुण आजही जास्तीत जास्त वेळ क्रीडांगणावर जिद्दीने सराव करतो त्यामुळे कुठल्याही खेळात तो यशस्वी होतो असे ते म्हणाले.या प्रसंगी सहचिटणीस दिगंबरजी गिते, विश्वस्त नामदेव काकड यांच्या सह गोदा युनियन चे अध्यक्ष लक्ष्मणराव सांगळे, सिन्नर येथील उद्योजक किशोरजी राठी ,आनंद भाऊ नावंदर,डॉ गणेश सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच क्रांतिवीर व्ही नाईक शिक्षण संस्थेचे जयंत बाबू आव्हाड यांनी यांनी सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले तसेच आपण एवढ्यावरच न थांबता आगामी काळात देखील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या शाळेचे गावाचे व तालुक्याचे नाव किर्तीवंत करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.या वेळी
संचालक समाधान, गायकवाड ,बंडु नाना भाबड , उद्धव कुटे, प्रकाश घुगे, शिक्षणाधिकारी एकनाथ भाबड ,नायगावच्या पोलीस पाटील जोशनाताई पानसरे,शालेय व्यवस्थापन समितीचे बाळासाहेब केदार, भाऊसाहेब सांगळे, दिलीपराव कातकाडे, विलास लहाने, दत्तात्रय दिघोळे,सुदाम भाऊ बोडके ,विष्णुपंत पाबळे, माजी जि प सदस्य अर्जुन बर्डे, सतीश लहाने,प्राचार्य शिवाजी आव्हाड,मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता शिंदे,दीपिका गरकळ,दिपाली कमोद, प्रा वाल्मीक पानसरे,एम ए सोनवणे,संध्याराणी पाटील,भारती पवार,कविता अहिरे, अर्चना गिते, राजेंद्र निकम,सुधीर सांगळे,रमेश जेजुरकर,, योगेश गायकवाड,रावसाहेब केदार,प्रतीक बच्छाव, शिवाजी जाधव , आर के बेलेकर,अनिल काकड, मारुती पाडेकर, कमलाकर चौधरी ,प्रदीप फुलमाळी , डी. बी. मोरे, प्रसाद बसते,चेतना उगले,आदी सह नायगाव पंचक्रोशीतील पालक,विद्यार्थी ,माता भगिनीमोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचलन जे डबल्यू सूर्यवंशी यांनी केले .कार्यक्रम यशस्वितेसाठी टी एस दिघोळे शैक्षणिक संकुलातील शिक्षक ,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.एससीएन न्यूजसाठी सुजल शितोळे#sinnarnews #sinnar #nashiknews #sinnarbatmya #trendingnews #rajkaran #politics #education #viralvideo #bjp #congress #shivsenaubt #shivsenashinde #rashtrvadisharadpawar #rashtrvadiajitpawar #rashtrvadi #shivsena #mns #raajthakre #uddhavthakre #ajitpawar #sharadpawar #eknathshinde #manikraavkokate #rajabhauvaje #simantinikokate #udaysangle #jayantavhad #rohitpawar #dhanajaymundhe #manikraavsabha #rajabhauvajesabha #rajabhauwajesabha #vidhansabhnivadnuk #vidhansabha #ladkibahinyojna #prachar #sinnrvidhansabha2024 #vidhansabha2024 #takedgat #sinnrshahr #chaganbhujbal #narharijhirval #swami#udaysangle #rajabhauwaje #sinnar #nashik #nashikcity #sharadpawar #supriyasule #rashtrawadi #congress #shivsena #uddhavthackeray #trendingreels #reelsfeelit#jitendraavhad
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: