आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य - आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2026-08-21
Просмотров: 143
Описание:
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून, वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या युवक-युवतींशी दोन दिवस सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण केवळ वसतिगृह प्रवेशाअभावी थांबू नये, यासाठी आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वसतिगृह प्रवेशासाठी वयोमर्यादा किमान ३० वर्षे असावी, या मागणीवरही सकारात्मक विचार करण्यात येत असल्याचं मंत्री उईके यांनी सांगितलं.
यावर्षी नवीन शासन निर्णय लागू झाल्यामुळे ३० वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी अशा विद्यार्थ्यांना ‘स्वयम’ योजनेच्या धर्तीवर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग सहकार्य करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे शासन संवेदनशीलतेनं पाहत असून, विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहनही आदिवासी विकास मंत्र्यांनी केलं.
#AshokUike #TribalStudents #TribalDevelopment #HostelAdmission #AdivasiStudents #SwayamYojana #MaharashtraGovernment #Education #StudentProtest #MaharashtraNews #StudentWelfare #AdivasiVikas #EducationNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: