तेलाचा वापर करून बनवा घरच्या घरी सॉफ्ट मार्बल केक रेसिपी |Marble Cake Recipe in Marathi |
Автор: Sneha Recipes
Загружено: 2025-11-04
Просмотров: 764
Описание:
नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चैनल मध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सॉफ्ट घरच्या घरी मार्बल केक ची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपी ला सुरुवात करुयात.#cake
💠साहित्य-
एक वाटी मैदा
अर्धी वाटी पिठीसाखर
अर्धी वाटी दूध
एक चमचा लिंबूचा रस
अर्धा चमचा बेकिंग पावडर
अर्धा चमचा बेकिंग सोडा
चिमुटभर मीठ
कोणत्याही प्रकारचा इसेन्स एक चमचा
1/4 कप तेल
कोको पावडर दोन चमचे
💠 कृती -
आधी आपल्याला दूध , तेल आणि इसेन्स या गोष्टी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मैदा, पिठीसाखर, अगदी थोडं मीठ, बेकिंग पावडर, किंग सोडा या सर्व गोष्टी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्याच्यानंतर तुम्हाला थोडसं बॅटर घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं दूध अजून वाढवू शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि पुन्हा एकदा आपलं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे बॅटर दोन भागांमध्ये डिवाइड करायचं आहे एका भागामध्ये आपल्याला कोको पावडर मिक्स करून घ्यायचा आहे.
आता आपल्याला कोणत्याही प्रकारचा किंवा आकाराचा केकचे भांडे घ्यायचा आहे त्याला आपल्याला बटर पेपर ने ग्रीस करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बॅटर एक झाल्यानंतर एक अशा प्रकारे त्याचा डिझाईन तयार करून घ्यायचा आहे.
इकडे आपल्याला कढई सुद्धा प्री हिट करून घ्यायचा आहे दोन मिनिटांसाठी झाकण लावून आणि जे आपण केकच्या टीम मध्ये बॅटर ओतलेलं होतं ते त्याच्यामध्ये 20 ते 25 मिनिटांसाठी मिडीयम फ्लेम वरतीच आपल्याला याला बेक करून घ्यायचा आहेघ्यायचा आहे.
केक 20 ते 25 मिनिटानंतर टूथपिक ने आपल्याला चेक करायचा आहे जर आपला केक झाला असेल तर थंड झाल्यानंतरच आपल्याला याला कट करून घ्यायचा आहे आणि मस्त असा मार्बल केक आपला तयार झालेला असेल.
How to make marbal cake recipe |
मार्बल केक रेसिपी मराठीमध्ये |
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: