Jalgaon | रविवारचा बाजार बंद असल्याने रस्त्यावर भरला बैल बाजार - स्थानिक प्रशासन झोपेत...
Автор: RNO Right News Online
Загружено: 2021-07-04
Просмотров: 172
Описание:
जळगाव - चोपडा, कोरोना व डेल्टा प्लस विषाणू च्या प्रसार होऊनही यासाठी राज्य सरकारने गेल्या आठवड्यापासून निर्बंध लागू केले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला आदेश जारी केले आहे. त्यानुसार शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
मात्र चोपडा शहर यापासून वेगळे दिसले चोपडा शहरात शनिवारी काही दुकाने भाजीपाला मार्केट बिंदास सुरू होते. तसेच आज देखील शहरातील ठराविक दुकाने व भाजीपालाचे हातगाड्या बऱ्यापैकी लागलेले होते आज आठवडा बाजार असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणारा बैल बाजार बंद ठेवल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर यावल रस्त्या लगतच्या जागेवर बैलबाजार भरवण्यात आला होता.
यावेळी शेतकऱ्यांनी रविवारचा बैल बाजार दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावे अशी मागणी केली आहे. चोपड्यातील स्थानिक प्रशासकीय अधिकारी शनिवार रविवार आपली जबाबदारी झटकून ऑफिस व मुख्यालयात राहत नसल्याने सरकारच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. म्हणूनच चोपडा शहरात शनिवार रविवार कडक निर्बंध असताना सर्रास दुकाने सुरू असतात.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: