#बुद्ध_आणि_त्यांचा_धम्म
Автор: JoShaBa
Загружено: 2025-01-14
Просмотров: 883
Описание:
#बुद्ध_आणि_त्यांचा_धम्म मराठीत Epi-46 | #BuddhaandhisDhamma | बुद्धाची प्रवचने | सदाचरण आणि दुराचरण
#Buddha'steachings
#TeachingsofBuddha
#भगवान_बुद्ध
#buddhaandhisdhamma #बुद्ध_आणि_त्यांचा_धम्म
#Buddha'steaching
#भगवान_बुद्ध_आणि_त्यांचा_धम्म
#bhagwanbuddhaanityanchadhamma
https://www.facebook.com/sumedhkumar....
https://www.instagram.com/sumedhkumar...
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
Episode 46
चतुर्थ खंड भाग चौथा
बुद्धाची प्रवचने
शुभकर्मांची (कुशल कर्मांची) आवश्यकता
शुभ संकल्पाची आवश्यकता
सदाचरणावरील प्रवचने
सदाचरण म्हणजे काय?
शुभकर्मांची (कुशल कर्मांची) आवश्यकता
“सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, ईप्सित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सित, प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ. या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे नि त्याची ग्वाही देऊ शकतो.”
शुभ संकल्पाची आवश्यकता
‘असा शुभ संकल्प करा की, आयुष्यभर मी आपल्या माता-पितरांचे परिपालन करीन. मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करीन. माझी वाणी सदैव मृदू राहील. मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन. औदार्याने, शुद्ध हस्ताने दान करण्यात आनंद मानीत राहीन. आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानीन. वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईन.’
‘आयुष्यभर शांत राहीन, क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तात्काळ मी निरोध करीन.’
सदाचरणावरील प्रवचने
सदाचरण म्हणजे काय?
‘शारीरिक दुराचरणाचे प्रकार येणेप्रमाणे : यांत मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्याची निर्दयतेने हत्या करीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणात मनुष्य जे आपले नाही ते घेतो. गाव आणि जंगल यांमधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो. तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात मातापिता, बंधूभगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या, वाड़निश्चय होऊन वाड़निश्चयाच्या मला धारण करणाऱ्या कन्येशी व्याभिचार करणे यांचा समावेश होतो.
‘वाचिक दुराचरणात प्रथम खोटेपणा मोडतो. यांमध्ये सभेत अथवा गावाच्या, कुटुंबाच्या, राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देताना जे माहीत नाही ते माहित आहे, जे माहीत आहे ते माहीत नाही, जे पाहिले नाही ते पाहिले, पाहिले ते पाहिले नाही, अशा तऱ्हेची स्वार्थासाठी अथवा कुणा माणसासाठी अथवा य:कश्चित लाभाच्या अभिलाषेने मनुष्य जाणूनबुजून साक्ष देतो. दुसऱ्या वाचिक दुराचरणात चुगलखोरीचा समावेश होतो. या दुराचरणांनी युक्त असलेला मनुष्य, माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत सुटतो. असा मनुष्य माणसा-माणसांतील ऐक्य मोडणारा, कलागती लावणारा असतो, कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते. कलागती हे त्याचे सुख आणि आनंद होय. तिसऱ्या प्रकारच्या वाचि दुराचरणाने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते. त्याचे शब्द असंस्कृत, कठोर, तीव्र, मर्मभेदी, क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात. चौथ्या प्रकारच्या दुराचरणांनी युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा माणूस. तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, काही हितकर बोलतो आहोत किंवा नाही याचा विचार करीत नाही. त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो. नीतीही नसते. काहीतरी क्षुद्र, अनुचित, पोरकट, ज्याला बुंधा नाही, शेंडा नाही अशी निरर्थक बडबड तो नेहमी करीत असतो.
‘वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात, लोभविकृतीचा समावेश होतो. असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास धरीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्याचा दु:स्वास, द्वेष यांचा अंतर्भाव होतो. असा मनुष्य दान, त्याग, दक्षिणा अशी काही गोष्टच नाही असे मानतो. त्याला वाटते सत्कर्म आणि असत्कर्म यांची फळे भोगावी लागतात हे खरे नव्हे; इहलोक आणि परलोक हे सर्व झूट आहे असे तो मानतो. आईबाप, आप्तेष्ट यांनाही तो मानत नाही. ज्यांनी सम्यक मार्गाने जाऊन इह-परलोकाचे ज्ञान मिळवले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात आहेत, या गोष्टीवर त्यांचा विश्वास नसतो.’
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: