Baramati | बारामतीत महिलेला फसवून मालमत्ता हडप;दुय्यम निबंधकाच्या मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल...
Автор: Maharashtra Today Live
Загружено: 2026-01-22
Просмотров: 5551
Описание:
#baramati
#politics
#maharashtrapolitics
#maharashtratodaylive
#maharashtranews
Baramati | बारामतीत महिलेला फसवून मालमत्ता हडप;दुय्यम निबंधकाच्या मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल...
बारामती शहरात एका विवाहित महिलेची मालमत्ता फसवणुकीने बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून,पतीसह पाच जणांविरोधात गंभीर स्वरूपाची कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणात बनावट सह्या,खोटे दस्तऐवज, बळजबरीने बक्षीसपत्र आणि संगनमताने जमीन विक्री केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.तक्रारदार महिला राणीमाला मिलिंद आवाळे बारामती येथे वास्तव्यास असून त्या गृहिणी आहेत.त्यांचे पती मिलिंद अंकुश आवाळे यांच्यासोबत घटस्फोटाचा दावा सध्या बारामती न्यायालयात प्रलंबित आहे.
या जमिनीच्या विक्रीसाठी वापरण्यात आलेला “चूक दुरुस्ती लेख” हा बनावट असून त्यावर राणीमाला आवाळे यांच्या खोट्या सह्या व अंगठे वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप राणीमाला आवाळे यांनी केला आहे.याप्रकरणात राणीमाला यांनी पुणे येथील हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली असून,त्यामध्ये दस्तऐवजांवरील सह्या बनावट असल्याचा स्पष्ट अहवाल प्राप्त झाला आहे.या फसवणुकीमध्ये पती मिलिंद आवाळे यांच्यासह रामदास गौड,बाळासो खराडे, प्रतीक बर्गे आणि पंकज रणदिवे यांनी संगनमताने भूमिका बजावल्याचा आरोप आहे.
तसेच जमीन खरेदी करणाऱ्या सविता व राजेश नाचन यांना देखील फसवणुकीची माहिती असूनही त्यांनी व्यवहार केल्याचा दावा करण्यात आला आहे.दरम्यान,याप्रकरणामुळे बारामतीत एकच खळबळ उडाली असून,महिलांच्या स्त्रीधनाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.संबंधित सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार महिलेने केली आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: