शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रु मदत द्या ओला दुष्काळ जाहीर करा जयंत पाटीलांची राज्य सरकारकडे मोठी मागणी
Автор: Aaj Marathi
Загружено: 2025-09-26
Просмотров: 726
Описание:
"शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये मदत द्या ओला दुष्काळ जाहीर करा जयंत पाटील यांची राज्य सरकारकडे मोठी मागणी" l आज मराठी
#आष्टीपूर #बीडबातमी #शेतकरीसंकट #जयंतपाटील #शेतकरीमदत #दिवाळीपूर्वीमदत #एकरी५०हजार #दुष्काळजाहीर #आजमराठी #MarathwadaFloods #FarmerSupport #AashtiUpdate
मराठवाड्यातील मुसळधार पावसाचा फटका – आष्टीत जयंत पाटील यांची शेतकऱ्यांसाठी ठाम मागणी मागील आठवडाभर मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून विशेषत: बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नद्या-नाले, ओढे ओसंडून वाहू लागले, वाड्यावस्त्यांमध्ये पाणी शिरले आणि शेती पाण्याखाली गेली. हजारो एकर शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवार दि. 26 सप्टेंबर रोजी आष्टी तालुक्यातील कडा येथे दौरा केला. परिस्थितीची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आज मराठीशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले : "शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी एकरी 50 हजार रुपयांची मदत द्या" "राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा"त्यांनी सरकारकडे ठामपणे मागणी केली की, शेतकरी उध्वस्त अवस्थेत असून त्यांच्या मदतीला तातडीने धावून गेलं पाहिजे. दिवाळीच्या आधी मदत मिळाली तरच शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळेल, अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होईल.आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये या मागणीमुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: