डाळिंब पांढरी मुळी महत्व
Автор: Sushant Survey🍎
Загружено: 2023-12-23
Просмотров: 2043
Описание:
डाळिंब शेती मध्ये आपण किती किलो खते किंवा किती महागडी खते जमिनीतून देतो आहे, यापेक्षा ते किती प्रमाणात लागू होते हे महत्वाचे आहे.
कोणत्याही पिकाची जर पांढरी तंतू मुळी योग्य व मोठ्या प्रमाणात चालू असेल तर जेवढे आपण जमिनीत टाकलेले आहे ते १००% अपटेक होण्यास मदत होते. झाडाची कोणतीही क्रिया योग्य प्रमाणात चालू ठेवणेसाठी, जसे कि फुलोरा-साईझ-कलर इत्यादी ला गती देणेसाठी झाडांची मुळी चालू असणे गरजेचे आहे.
निव्वळ फवारणीवर लक्ष न देता, झाडांची मुळी चालू आहे कि नाही याकडे पण अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. झाडांची पांढरी मुळी योग्य प्रमाणात चालू असेल, तर झाडांवरील बरचसे प्रॉब्लेम कमी होतात. झाडांचे योग्य पोषण होणेसाठी पांढरी मुळी नेहमीच गरजेचे आहे. अनेकदा निव्वळ तांबडी मुळी, अथवा मुळींवर गाठी अशी परिस्थिती अनेक बागांमध्ये असते, त्यामुळे झाडांना अन्नद्रवे उपलब्ध होत नाही. व त्यामुळे फुलोरा नीट येत नाही, फळांची साईझ मिळत नाही किंवा बागेमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढला जातो.
त्यामुळे "ज्या बागेत पांढरी मुळी चांगली चालू आहे-अपटेक १००% होत आहे, त्या ठिकाणी प्रत्येक स्टेज मध्ये उत्तम असे रिझल्टस तुम्हाला बागेमध्ये दिसतील"
(वरील व्हिडीओ हा,अनारकिंग नवसंजीवनी वापरलेला आहे. साधारणतः एकरी १००० रुपये खर्च मध्ये चांगली पांढरी मुळी,निम्याटोडच्या गाठींमधून नवीन पांढरी मुळी निघणेसाठी, निम्याटोड चा प्रादुर्भाव कमी करणेसाठी, फळांची साईझ होणेसाठी, पाने-फळांना चकाकी इत्यादींसाठी अनारकिंग नवसंजीवनीचा रिझल्ट खूप चांगला आहे.)
धन्यवाद.
श्री सुशांत हिरालाल सुर्वे
डाळिंबशेती मार्गदर्शक
संगमनेर.
#superfruit #farming #pomegranate #Anarking #pomegranate_farming #नवीन_डाळिंब_बाग #anar #horticulturist #fruit #डाळिंबवार्ता #dalimbvarta #dalimbsheti #डाळिंब #डाळिंबशेती #digital_agronomist #agronomy #PrecisionFarming #Pomegranate #पांढरीमुळी #अनारकिंगनवसंजीवनी #whiteroots #HealthyRoots #NutrientUptake #अन्नद्रवेउपलब्धता
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: