Shirdi Nagarparishad Election | शिर्डी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री थोरातांचा ‘ग्राउंड टच’
Автор: SP 24 TAAS
Загружено: 2025-11-19
Просмотров: 17072
Описание:
Shirdi Nagarparishad Election | शिर्डी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री थोरातांचा ‘ग्राउंड टच’
हातात बाजाराची पिशवी..... कांदा बटाटे आणि भाजीपाल्याचे तोल मोल करुन खरेदी करणा-या ह्या आहेत शिर्डीतील महायुतीच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात...
सध्या सर्वत्र निवडणूकीचं वारं वाहतय.... अशातच मोठ्या पक्षांकडून उमेदवारी अर्ज मिळालेल्या उमेदवारांची बात काही औरच असते..
मात्र शिर्डीत काहीसं वेगळ दिसतय..
देशातील क्रमांक दोनचे तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीतील नगरपरिषद निवडणूकीत, महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री थोरात चक्क आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करतांना दिसून आल्याय..
जयश्री थोरात या मूळच्या अतिशय साध्या, सर्वसाधारण राहणीमान असलेल्या महिला. शिर्डी नगरपरिषदेसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर ही जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाली. त्यानंतरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सर्वसामान्य चेहरा पुढे करत थोरात यांना उमेदवारी दिली.
थोरात यांनी सोमवारी नगरपरिषदेत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि दुस-या दिवशी मंगळवारचा आठवडे बाजार ....
मगं काय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री थोरात बाजाराची पिशवी घेवून नेहमी प्रमाणे आठवडे बाजारात दाखल..
हातात बाजाराची पिशवी..., सोबत पाच-सहा मैत्रिणी, भावताव करत भाजी निवडताना त्या अगदी सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून गेल्याचं दृश्य पाहायला मिळालं...
शिर्डीत पाच शेरूम भक्तनिवासच्या मागे साईव्दरका नगरमध्ये त्यांचं निवासस्थान... यापूर्वी 2008-09 दरम्यानही त्यांनी विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तेव्हादेखील त्या घर-गुती जबाबदाऱ्या पेलत, गावगाड्याची धुरा संभाळली आहे.. , तेव्हा देखिल आठवडे बाजारात डोक्यावर पिशवी घेऊन भाजी खरेदी करणाऱ्या ‘साध्या’ नगराध्यक्षा म्हणून शिर्डीकरांच्या परिचयात होत्याच..
आता 2025 च्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. देशातील क्रमांक एकच्या पक्षाकडून उमेदवारी मिळूनही हवेत न जाता, जमिनीवर राहणं—हेच आठवडे बाजारातील त्यांच्या या साध्यासुध्या वागण्यावरून पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं...
#sp24taas #shirdinagarparishad #sujayvikhepatil #shirdielection #vikhevsthorat #shirdi #shirdiupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: