जय देवा हनुमंता वायु अंजनीच्या सुता | हनुमानाची आरती | Jay Deva Hanumanta | Hanuman Aarti Marathi
Автор: Vision Bhakti Marathi
Загружено: 2022-04-15
Просмотров: 1044522
Описание:
Title - Jay Deva Hanumanta
Singer - Mahesh Hiremath, Shubhangi Joshi
Copyrights - Bhakti Vision Entertainment
जय देवा हनुमंता जय अंजनीसुता ॥
ऊँ नमो देवदेवा राया रामाच्या दूता ॥
आरती ओवाळीन ब्रह्मचारी पवित्रा ॥ ध्रु ॥
वानरूपधारी ज्याची अंजनी माता । हिंडता वनांतरी भेटी झाली रघुनाथा ॥
धन्य तो रामभक्त ज्याने मांडिली कथा ॥ जय०॥ १ ॥ जय देवा हनुमंता ।
सीतेच्या शोधासाठीं रामे दिधली आज्ञा ॥ उल्लंधुनी समुद्रतीर गेला लंकेच्या भुवना ॥
शोधूनी अशोकवना मुद्रा टाकिली खुणा ॥ जय०॥२॥ जय देवा हनुमंता ।
सीतेसी दंडवत दोन्ही कर जोडून ॥ वन हे विध्वंसिले मारिला अखया दारुण ।।
परतोनी लंकेवरी तवं केले दहन ॥ जय० ॥३॥ जय देवा हनुमंता ।
निजबळे इंद्रजित होम करी आपण । तोही त्वां विध्वसिला लघुजंका करून ॥
देखोनी पळताती महाभूते दारुण ॥ जय० ॥ ४ ॥ जय देवा हनुमंता ।
राम हो लक्षुमण जरी पाताळी नेले । तयांच्या शुद्धीसाठी जळी प्रवेश केले ॥
अहिरावण महिरावण क्षणामाजि मर्दिले ॥ जय०॥ ५ ॥ जय देवा हनुमंता ।
देउनी भुभुःकार नरलोक आटीले । दीनानाथ माहेरा त्वां स्वामिसी सोडविले ॥
घेऊनी स्वामी खांदी अयोध्येसी आणिले ॥ जय० ॥ ६ ॥ जय देवा हनुमंता ।
हनुमंत नाम तुझे किती वर्णू दातारा । अससी सर्वाठायी हारोहारी अम्बरा ॥
एका जनार्दनी मुक्त झाले संसारा ॥ जय० ॥७॥ जय देवा हनुमंता ।
नमस्कार,
भक्ती मराठी - या मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे.
या चॅनल वरती श्री गणेशाचे, श्री विठ्ठलाचे, स्वामी समर्थांचे, महादेवाचे, दत्तगुरूंचे, देवीचे, श्री हनुमान व इतर मराठी भक्तिगीते, स्तोत्र, अभंग, कीर्तन, आरती, मंत्र या चॅनेल वरती प्रकाशित होतील..
भक्ती मराठी.. या चॅनेल ला नक्की subscribe करा🙏 ही नम्र विनंती🙏
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: