"वारंवार सर्दी, खोकला, दमा?" भाग 1
Автор: Dr. Atul Rakshe Ayurveda Pune
Загружено: 2025-04-10
Просмотров: 7361
Описание:
नमस्कार.
मी डॉक्टर अतुल राक्षे.
बाराही महिने सर्दी होते, खोकला येतो, दम लागतो अश्या प्रकारचे- म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा याचा काही फरक नाही...
पावसाळ्यातसुद्धा सर्दी होते, हिवाळ्यातही सर्दी होते, उन्हाळयातही सर्दी होते-
असे अनेक पेशंट्स असतात, त्यांच्यासाठी ही रील.
सगळ्यात महत्त्वाचं 'म्हणजे सर्दी का होते'; हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. पण सर्दी झाल्यानंतर "घरगुती उपाय काय करु?" असं मला पेशंट्स विचारतात;
त्यांच्यासाठी काही 2 3 महत्त्वाच्यागोष्टी सांगतो.
पहिली गोष्ट, नाकामध्ये तेल सोडणं. म्हणजे तुम्ही जर का दोन-दोन थेंब करंगळीने नाकात तेल वापरलंत.. अणू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल , जेष्ठमधाचं तेल किंवा वचा तेल
अशी वेगवेगळी 'नस्या'ची तेलं मिळतात. ती नुसती करंगळीने आंघोळीच्या वेळेला नाकात लावली तर त्याच्यामुळे तुमच्या सर्दीमध्ये निश्चितपणे सर्दीने विशेषता ज्यांच डोकं दुखतं,
त्यांना नक्की फरक पडेल.
दुसरे म्हणजे, ग्लासभर गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक चमचाभर तिळाचं तेल घातलंत आणि ती चूळ धरून ठेवल्याने
पण सगळे चॅनल्स ब्लॉक झालेले असतात, ते ओपन व्हायला मदत होते.
आणखी एक महत्वाचा उपाय म्हणजे एक कप दुधामध्ये, अर्धा कप पाणी त्याच्यामध्ये एक लेंडी पिंपळी, चिमूटभर सुंठ आणि अर्धा चमचा हळद घालायची ते सगळं मिश्रण मंद आचेवर उकळू द्यायचं.
एक उकळी आल्यानंतर गाळून घ्यायचं. चवीपुरती साखर घालून प्यायचं. तुम्ही सकाळी नाश्त्या नंतर घेऊ शकता किंवा
संध्याकाळी चहाच्या ऐवजी घेऊ शकता.
दोन्ही वेळा पण येऊ शकता.
#allergies #asthma #sinusitistreatment #ayutv #ayurveda #dratulrakshe #ayurvedapuneअगदी लहान मुलापासून तर म्हातार्या माणसापर्यन्त कोणीही घेऊ शकता. याच्यामुळे तुमच्या शरीरात साठणारा कफ, चिकट- नाकातून जर कफ येत असेल तो थुंकीतनं पडत असेल, त्याच्यावरती निश्चितपणे फायदा होतो.
ही सगळी औषधं ही कफ कमी करणारी तरीसुद्धा पित्त किंवा उष्णता न वाढू देणारी अशी असतात.
त्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक वाटलं किंवा आवडत असेल तर थोडसं केसर पण घालू शकता.
द्राक्षं , स्ट्रॉबेरी, ताक, दही, आमसूल, टोमॅटो याच्या पासनं थोडेसे दूर रहा.
एवढी काळजी घेतली तर तुम्हाला सर्दी, खोकला दमा ह्याच्यावरती निश्चितपणाने कंट्रोल ठेवता येईल.
तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कॉमेन्ट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा..
#allergies #asthma #sinusitistreatment #ayutv #ayurveda #dratulrakshe #ayurvedapune
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: