कार्तिकी एकदाशी माहिती
Автор: Gurumauli गुरुमाऊली
Загружено: 2025-10-31
Просмотров: 326793
Описание:
कार्तिकी एकदाशी माहिती #vithumauli #vishnu
आषाढ महिन्यात येणारी देवशयनी किंवा आषाढी एकादशी आणि कार्तिक महिन्यात येणारी कार्तिक एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी.याच एकादशीला देवोत्थानी, प्रबोधिनी, देवउठनी किंवा देवोत्थान एकादशी या नावांनीही ओळखले जाते
या दिवशी भगवान विष्णू ४ महिन्यांच्या योगनिद्रातून जागे होतात. यानंतर सर्व शुभ कार्ये सुरू होतीत या चार महिन्यांना चतुर्मास असे म्हणतात.मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होते. मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथींपैकी कार्तिकी एकादशीचे महात्म्य वेगळे आहे. या दिवशी विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते. तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात. या दिवसापासून तुलसीविवाहारंभ ची सुरवात होते . कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते, अशी मान्यता आहे. शालिग्राम आणि तुळशीमातेचा विवाह प्रबोधिनीला रात्री होतो. तुळशीमातेच्या विवाहानंतरच लग्न कार्याला सुरुवात होते.भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे. श्रीविष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशीवाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हंटले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला, असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचे उद्यापन करतात.या एकादशीच्या दिवशी दान करणे श्रेष्ठ मानले जाते.एकादशीचे व्रत केल्यास धन, मान-सन्मान आणि संतती सुखाबरोबरच अपेक्षित फल प्राप्त होते, असा विश्वास आहे. एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात.चातुर्मासात मंगल कार्य करत नाहीत त्यामुळे कार्तिकी एकादशी नंतर सर्व मंगल कार्याना सुरवात होते
Music credit : Tanmayee Mishra
Sanjay Salkar, Sayali Desai
#visnuaarti #kartikiekadashi #vitthal #lakashmi
#gurumauli #gurudevdatta #guru #गुरुदेवदत्त #dattatreya #dattagurumaharaj #dattagurumantra #dattachigani #दत्ताचीपालखी #दत्तगुरु #marathi #marathivlog #shreevasudevanandsaraswati #shreeswamisamarth #shreepadshreevallabh #pithapuram #gangapur #dattachipalkhi #marathivideo #sayali
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: