4 हॉस्पिटल्स, फॉलोअप डेट, जुन्या रागाचा दावा, Deenanath Hospital Tanisha Bhise case मध्ये काय घडलं?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-04-06
Просмотров: 131426
Описание:
#BolBhidu #TanishaBhise #DeenanathMangeshkarHospital
हॉस्पिटलचा पैशांसाठी हट्ट आणि आई जीवाला मुकली, या बातम्या गुरुवारी ३ एप्रिलला टीव्ही, पेपर अशा बातम्या सगळीकडे आल्या आणि फक्त पुण्याला नाही तर सगळ्या महाराहाष्ट्राला धक्का बसला. तनिषा भिसे या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आल्या, पण हॉस्पिटलनं आधी १० लाख रुपये डिपॉझिट भरा अशी मागणी केली, त्याशिवाय तनिषा यांच्यावर उपचार करायला नकार दिला, याचा त्रास तनिषा यांना झाला आणि पुढे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, या सगळ्याला दीनानाथ हॉस्पिटलने पैशांच्या हट्टासाठी केलेला उशीर कारणीभूत आहे असे आरोप भिसे कुटुंबीयांनी केले. त्यावर हॉस्पिटलनं आपली बाजू मांडली आणि तनिषा यांना प्रसूतीची रिस्क घेऊच नये असा सल्ला आपण दिला होता असा दावा केला. आता सध्याची परिस्थिती पाहिली, तर तनिषा भिसे यांनी जन्म दिलेल्या दोन चिमुकल्या मुली हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे, पण त्यांच्यापासून त्यांची आई हिरावली गेली आहे. पण या प्रकरणात आता वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत.
भिसे यांनी IVF ची ट्रीटमेंट एका हॉस्पिटलमध्ये घेतली, त्यानंतर त्या प्रसुतीसाठी दीनानाथमध्ये आल्या, त्यांची प्रसूती सूर्या हॉस्पिटलमध्ये झाली आणि त्यांचा मृत्यू मणिपाल हॉस्पिटलमध्ये झाला. पण मुळात त्यांना चार हॉस्पिटल बदलायची वेळ का आली ? त्यांचा मृत्यू कशामुळे झाला ? दीनानाथ हॉस्पिटलनं केलेल्या दाव्यानुसार भिसे खरंच फॉलोअपला गेल्या नाहीत का ? असे असंख्य प्रश्न समोर आहेत. या सगळ्याचीच स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: