उपवास असेल तर करा हे (साबुदाणावडा)
Автор: OVEE'S kitchen
Загружено: 2024-08-11
Просмотров: 330
Описание:
साबुदाणा वडा रेसीपी......
सर्वप्रथम साबुदाणा घेऊन व्यवस्थित धुऊन रात्रभर भिजत घालून घेऊ. रात्रभर साबुदाणा भिजत घातल्यामुळे साबुदाणा छान फुलून नरम होतो
सकाळी साबुदाणा छान भिजल्यावर हाताने मोकळा करून घेऊ. आता वेगळ्या पॉटमध्ये साबुदाणा घेऊन त्यावर उकडलेले बटाटे कुस्करून किंवा किसून घ्यायचे, शेंगदाण्याची पाउडर, मिरचीची पेस्ट, मीठ, टाकून व्यवस्थित मिक्स करून
उपवासात तुम्ही कोथिंबीर खात असाल तर टाकू शकतो आम्ही कोथिंबीर खात नाही म्हणून मी टाकली नाही.
आता पूर्ण साबुदाणे व्यवस्थित हाताने मिक्स करून पिठासारखा गोळा तयार करून साईडला दाबून लावून घेऊ.
आता हाताला थोडे पाणी लावून एक एक गोळा हातावर घेऊन चपटे असे गोल गोल वडे तयार करून घेऊ
तेल चांगले गरम करून घ्यायचे. तेल गरम झाल्यावर गॅस मध्यम करून द्यायचं आता तयार वडे तेलात सोडून तळून घेऊ
एका साईडने तळून झाल्यामुळे पलटून दुसऱ्या साईडने ही तळून घेऊ लाल रंगावर वडे खरपूस तळून घेऊन वडे छान फुलून जातात. वडे तळताना हा गोल प्रकारचा झारा वडे तळत असताना त्याच्यावरती उलटा ठेवून द्यायचा यामुळे अचानक वडा फुटल्यावर आपल्या अंगावर उडत नाही.
बऱ्याच दा वडे तळत असताना एखादा साबुदाणा फुटून बाहेर उडतो तसे नको व्हायला म्हणून असा झारा उलटा वड्या वर ठेवून द्यायचा.
अशाप्रकारे सगळे वडे तयार करून तळून घेऊ. छान टमटम फूललेले लालसर खरपूस असे वडे तयार होतात
दिल्या प्रमाणानुसार मिडीयम साईज चे वडे तयार होतात.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: