Nashik Chennai Expressway: 6 राज्यांमधून जाणाऱ्या Greenfield Highway चा महाराष्ट्राला काय फायदा?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-01
Просмотров: 97147
Описание:
#BolBhidu #NashikChennaiExpressway #NashikAkkalkotHighway
नाशिकमध्ये रामकुंडावर गोदास्नान आणि काळारामाचं दर्शन करुन निघाल्यावर केवळ ४ तासात तुम्ही अक्कलकोटला पोहोचू शकाल. आणि तिथून पुढं तिरुपतीला जायचं असेल, तर फक्त ८ तासात तिरुमलाच्या पायथ्याशी पोहोचता येईल. ऐकताना हे थोडंस धक्कादायक वाटत असेल, पण अशक्य नक्कीच नाही. येत्या दोन ते तीन वर्षांत नाशिक आणि अक्कलकोट या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थानामधलं अंतर कमी होणार आहे. आणि हे शक्य होईल, सहापदरी महामार्गामुळं. नव्या वर्षात महाराष्ट्राला पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात हे मोठं गिफ्ट मिळालं आहे. केंद्र सरकारने नुकताच नाशिक ते अक्कलकोट या ग्रीन फिल्ड महामार्गाची घोषणा केली आहे.
सुरत-चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग असलेल्या या महामार्गामुळं नाशिक आणि सोलापूर या दोन शहरांमधलं अंतर तर कमी होईलच, शिवाय बेंगळुरू आणि चेन्नईपर्यंतच्या वाहतुकीचं अंतर आणि वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळं नाशिकपासून अक्कलकोट आणि तिरुपती या प्रवासाला लागणारा वेळेचीही बराच कमी होईल. शिवाय, हा नवा महामार्ग तीन मोठ्या महामार्गाना जोडला जाणार असल्याने राज्यातल्या दळणवळणालाही मोठी चालना मिळणार आहे. नाशिक ते अक्कलकोट या नव्या महामार्गाचा हा प्रकल्प नेमका काय आहे तो कशाप्रकारे उभारण्यात येईल आणि त्याचे राज्याला कोणते फायदे होतील सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: