📰 अतिवृष्टीतही डॉ. हेडगेवार रक्तपेढीची मदतीची परंपरा कायम! 🌧️..
Автор: Dr. Hedgewar Raktapedhi, Solapur
Загружено: 2025-10-03
Просмотров: 13
Описание:
📰 अतिवृष्टीतही डॉ. हेडगेवार रक्तपेढीची मदतीची परंपरा कायम! 🌧️
सोलापूर जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. घरे, शेती, शाळेचे साहित्य – सगळंच पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या कठीण प्रसंगात डॉ. हेडगेवार रक्तपेढी पुन्हा एकदा धावून आली आहे. 🙏
शिबिर संयोजक श्री. सिद्रामप्पा पाटील यांच्या विनंतीवरून प्रभावित गावांमधील ४० कुटुंबांना साड्या वाटप करण्यात आल्या. रक्तपेढीचे अध्यक्ष मा. श्री. सतीश मालू व सचिव मा. श्री. मिलिंद फडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत गावापर्यंत पोहोचविण्यात आली.
यावेळी ग्रामस्थ, माजी उपसरपंच श्री. चंद्रकांत जावीर, श्री. नाना गायकवाड, व्यवस्थापक रंगनाथ जोशी, जनसंपर्क अधिकारी संगीता कोरे, तसेच रक्तपेढीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गावातील एका कुटुंबियांनी सांगितले –
“धान्य, मुलांचे कपडे, शालेय साहित्य सर्व काही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. तातडीची मदत हवी आहे.”
तर ग्रामस्थांनी विनंती केली –
“आगामी दिवाळीत जर फराळासाठीचे किराणा साहित्य मिळाले, तर आमची दिवाळी उजळेल.”
👉 सध्या गावात एकूण १३५ घरे बाधित असून शक्य ती सर्व मदत अत्यंत आवश्यक आहे.
🙏 समाजातील सर्व दानशूर नागरिकांना आवाहन – धान्य, किराणा, कपडे किंवा आर्थिक मदत करुन या कुटुंबांना दिलासा द्या.
📞 मदतीसाठी संपर्क : डॉ. हेडगेवार रक्तपेढी, सोलापूर - 9404874297
“आपली छोटीशी मदत… कुणाच्या संसाराला नवजीवन देईल!” 🩸💝
#drhedgewarraktapedhisolapur #SocialService
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: