एनडी म्युझिकप्रोडक्शन तर्फे आयोजित ‘द अल्टिमेट बॉलीवूड संगीत रजनीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Автор: Pune Headline News
Загружено: 2023-12-17
Просмотров: 107
Описание:
@puneheadlinenews #puneheadlinenews #punenews #dilipsen #punenews
सुरेल गायन वादनाने सजली संगीत रजनी
संगीत क्षेत्रात आमची चौथी पिढी - ज्येष्ठ संगीतकार दिलीप सेन
एन डी म्युझिक प्रोडक्शन तर्फे आयोजित ‘द अल्टिमेट बॉलीवूड संगीत रजनी पुणेकर संगीत प्रेमी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे -विविध वाद्यांचे श्रवणीय वादन आणि सुरेल गायकी ने रसिकांना उत्तम सिनेसंगीताची अनुभूती मिळाली. निमित्त होतं एन डी म्युझिक प्रोडक्शन तर्फे आयोजित ‘द अल्टिमेट बॉलीवूड’ संगीत रजनीचं. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात संगीतकार आणि गायिका निवेदिता दत्ता आणि अनुपमा कुलकर्णी यांनी संगीत रजनी चे आयोजन केले होते. ८० व ९० च्या दशकातील लोकप्रिय गाण्यांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात विविध वाद्यांच्या आणि गायकीच्या सुरेख मिलाफाने रसिकांना तृप्त केले. या कार्यक्रमाची सुरुवात ९०च्या दशकातील लोकप्रिय संगीतकार दिलीप सेन व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलानाने करण्यात आली.या कार्यक्रमास पुण्याचे माजी महापौर प्रसन्न जगताप,ॲड. अभय छाजेड, ॲड. केशव मगर, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पं. हेमांग मेहता, गायक राजेश दातार, डॉ. अंजली जोशी, सागर घोडके, अल्टिमेट बॉलीवूड कार्यक्रमाच्या आयोजिका एन डी म्युझिकच्या संचालिका निवेदिता दत्ता ,अनुपमा कुलकर्णी, मध्यम तज्ञ करून पाटील आदी मान्यवर .संगीत रजनीस उपस्थित होते. स्थानिक कलाकारांखेरीज अतिथी कलाकार व्हॉईस ऑफ किशोर कुमार म्हणून प्रसिध्द असलेले मुंबई चे गायक मंगेश वडागळे यांनी कार्यक्रमात मुसाफिर हू यारो.. व जाने जा ढूँढता फिर रहा .. ही गाणी सादर केली. जेष्ठ संगीतकार दिलिप सेन यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना दिलीप सेन म्हणाले, चित्रपट सृष्टीत आमच्या चार पिढ्यांनी संगीत दिलंय. आजोबा जमाल सेन, वडील शंभू सेन, पुतणे समीर सेन व नातू सोहेल सेन असा आठ दशकाहून अधिक काळ सेन कुटुंबीय संगीत क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिलीप सेन यांनी सांगितले.
कार्यक्रमात आयोजिका व संगीतकार निवेदिता दत्ता, अनुपमा कुलकर्णी, ज्योती एस अग्रवाल, निवेदिता साहा, श्रध्दा गायकवाड, सुनेत्रा पवार, ऋषिकेश ग्रामोपाध्ये, राजीव आनंद, सौम्यश्री मॉल, अजय जोशी व विक्रम बक्षी यांनी एकाहून एक सरस गाणी सादर केली. डिजिटल संगीताचा बोलबाला असलेल्या सध्याच्या काळात रंगमंचावर सलग तीन तास कीबोर्डवर असिफ खान व सईद खान, ट्रम्पेट व सॅक्सोफोन वर बाबा खान, गिटार वर हार्दिक रावल, बासरीवर सचिन वाघमारे, रिदम मशीनवर आसिफ इनामदार, ढोल ताशा वर विनोद सोनवणे, तबला आणि ढोलकवर रोहित साने, ढोलकवर झाकीर शेख आणि तुंबा वर सोमनाथ फाटके यांनी केलेल्या बहारदार वादनाने रसिकांना अक्षरशः खिळवून ठेवले. कार्यक्रमाचे निवेदन अर्चना कदम यांनी केले होते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: