वेगळ्या विदर्भ राज्यच्या मागणीसाठी नागपूरच्या व्हेरायटी चौकात नागपूर कराराची होळी करत आंदोलन..
Автор: NEWS TEN
Загружено: 2025-09-29
Просмотров: 42
Описание: अँकर:- विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या व्हेरायटी चौकात नागपूर कराराची होळी करत तीव्र आंदोलन छेडले. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी गेल्या अनेक दशकांपासून सातत्याने लढा सुरू आहे.आंदोलकांनी सांगितले की, 28 सप्टेंबर 1953 रोजी नागपूर करार झाला होता. या करारात अकरा कलमे होती; त्यानुसार 23 टक्के विकास विदर्भात व्हायला हवा होता. परंतु आजवर त्या अकरा कलमांपैकी एकाचाही पूर्णपणे अंमल झालेला नाही. अधिवेशन फक्त औपचारिकतेसाठी भरवले जात असून, त्यात विदर्भाच्या प्रश्नांना स्थान दिले जात नाही. परिणामी, विदर्भावर सतत अन्यायच होत असल्याचा आरोप समितीने केला.आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “आता स्वतंत्र विदर्भ राज्य मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. नागपूर करार हा विदर्भाच्या जनतेला फसवणुकीचा करार ठरला आहे. आम्हाला स्वतंत्र विदर्भ राज्य द्या नाही तर विदर्भाला नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही अस मत आंदोलकांनी स्पष्ट केलं..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: