Shree Swami Samarth Ashtak with Lyrics 🙏 श्री स्वामी समर्थ अष्टक | स्वामी भक्ती, श्रद्धा आणि शांती 🔱
Автор: जय श्री स्वामी समर्थ महाराज
Загружено: 2025-12-31
Просмотров: 16233
Описание:
🙏 अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी असे श्री स्वामी समर्थ अष्टक हे स्तोत्र भक्तिभावाने ऐकावे. हे अष्टक इच्छापूर्ती, संकटनिवारण, मानसिक शांती आणि भयमुक्ती देणारे शक्तिशाली स्तोत्र मानले जाते.
► Singer :- Prachi Panchal
► Music :- Traditional
► Lyrics :- Traditional
► Producer :- Jiyo Music
► Label / Company :- Shri Swami Samartha
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🙏|| श्री स्वामी समर्थ ||🙏
श्री स्वामी समर्थ अष्टक
असे पातकी दीन मी स्वामीराया, पदी पातलो सिध्द व्हा उध्दराया II
नसे अन्य त्राता जगी या दीनाला, समर्थां तुझ्याविण प्रार्थु कुणाला...?
मला माय ना बाप ना आप्त बंधु, सखासोयरा सर्व तू दीनबंधू
तुझा मात्र आधार या लेकराला, समर्थां तुझ्यावीण प्रार्थु कुणाला...?
नसे शास्त्र, विद्या कलादीक काही, नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथाही
तुझे लेकरु ही अहंता मनाला, समर्थां तुझ्याविण प्रार्थू कुणाला....?
प्रपंची पूरा बध्द झालो दयाळा, तुझा दास मी ही स्मृती ना मनाला
क्षमेची असे याचना त्वत्पदाला, समर्थां तुझ्याविण प्रार्थू कुणाला...?
मला कामक्रोधादी नागवीले, म्हणोनी समर्थां तुला जागवले
नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्थां तुझ्याविण प्रार्थू कुणाला....?
नको अंत पाहू त्वरे धाव घेई, तुझ्याविना नाही दुजी श्रेष्ठ आई
अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्थां तुझ्याविण प्रार्थू कुणाला. ..?
कधी गोड वाणी न ये मुखाला, कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला
कधी मूर्ती तुझी न ये लोचनाला, समर्थां तुझ्याविण प्रार्थू कुणाला...?
मला एवढी घाल भिक्षा समर्थां, मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा
घडो पादसेवा तुझी किंकराला, समर्थां तुझ्याविण प्रार्थू कुणाला...?
🙏|| श्री स्वामी समर्थ ||🙏💐
जर तुम्हाला हा भक्तिपूर्ण स्तोत्र आवडला असेल तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका.
स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहो.
/ @jaishriswamisamarth
या व्हिडिओमध्ये तुम्हाला—
✔️ पूर्ण अष्टक मराठी लिरिक्ससह
✔️ स्पष्ट उच्चार आणि मंत्रमय ध्वनी
✔️ ध्यान, पूजा व दैनंदिन जपासाठी उपयुक्त आवृत्ती मिळेल.
_______________________________________________________
✨ अष्टकाचे लाभ (Benefits)
मन:शांती आणि आत्मविश्वास वाढवते
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते
संकट आणि अडचणींवर मात करण्यास मदत करते
कार्यसिद्धी, इच्छापूर्ती आणि दररोजच्या जीवनात संरक्षण देते
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: