बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ मराठी Epi-54 | Buddha and his Dhamma | भिक्खू आणि त्याच्या प्रतिज्ञा |
Автор: JoShaBa
Загружено: 2025-10-06
Просмотров: 434
Описание:
बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ मराठी Epi-54 | Buddha and his Dhamma | भिक्खू आणि त्याच्या प्रतिज्ञा | भिक्खू आणि धार्मिक दोष | भिक्खू आणि प्रतिबंध | भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम
#भगवान_बुद्ध_आणि_त्यांचा_धम्म
#bhagwanbuddhaanityanchadhamma #buddhaandhisdhamma
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
Episode 54
पंचम खंड भाग-पहिला
संघ
भिक्खू आणि त्याच्या प्रतिज्ञा
१) उपासक आणि श्रामणेर शीलप्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो.
२) भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून, शीलव्रताचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते. उल्लंघन झाल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो.
३) भिक्खू ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो.
४) भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो.
५) भिक्खू वृथा वल्गना न करण्याची प्रतिज्ञा करतो.
६) भिक्खू जीवहत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो.
७) नियम ज्याची अनुज्ञा देत नाही त्या वस्तू जवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो.
८) भिक्खूला खालील आठ वस्तू फक्त जवळ बाळगता येतात: (१) शरीर आच्छादनासाठी तीन चीवरे; ती म्हणजे (i) कंबरेस गुंडाळण्याचे अंतरवासक, (ii) अंगावर घ्यावयाचे उत्तरासंग आणि (iii) थंडीवाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र. (२) करगोटा (३) भिक्षापात्र (४) वस्तरा (५) सुई धागा (६) पाणी गाळण्याचा कपडा.
९) भिक्खू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो. अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षेवरच त्यांनी आपली उपजीविका केली पाहिजे. दिवसातून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे. ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे.
१०) भिक्खू आज्ञापालनाची प्रतिज्ञा करीत नाही. आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखविणे, ह्या गोष्टी श्रामणेराकडून अपेक्षित असतात. भिक्खूची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते. त्याने वरिष्ठाच्याऐवजी धम्माची आज्ञा पाळावयाची असते. त्याच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा अथवा मोक्ष दानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानीत नाही. अधःपतन अथवा उद्धार हा ज्याच्या त्याच्या स्वाधीन आहे, म्हणून त्याला विचारस्वातंत्र्य असले पाहिजे.
११) प्रतिज्ञाभंग घडल्यास भिक्खूच्या हातून पाराजिका हा दोष होतो. पाराजिका दोषास शिक्षा म्हणजे संघातून हकालपट्टी करणे.
भिक्खू आणि धार्मिक दोष
१) भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते.
२) या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात. त्यांना संघादिसेस अशी संज्ञा होती.
३) विनयपिटकांत अशा तेरा अपराधांची यादी आढळते.
४) ते पाराजिकासारखे आहेत.
भिक्खू आणि प्रतिबंध
१) संघादिसेस आणि पाराजिका यांशिवाय भिक्खूला काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागत. गृहस्थासारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही.
२) यापैकी एका प्रतिबंध प्रणालीला निस्सगीय पाचित्तिय अशी संज्ञा असून, त्यात भिक्खूने पाळावयाचे सव्वीस प्रतिबंध समाविष्ट होतात.
३) हे प्रतिबंध चीवरे, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र आणि औषधी यांच्या स्वीकृती-अस्वीकृती संबंधी आहेत.
४) काही प्रतिबंध सुवर्ण आणि रौप्य यांचे दान घेणे वा न घेणे यांसंबंधी आहेत. काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खूंसंबंधी आहेत.
५) या प्रतिबंधाच्या उल्लंघनास निस्सगीय म्हणजे परतफेड आणि पाचित्तिय म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे ह्या शिक्षा सांगितलेल्या आहेत.
६) ह्या प्रतिबंधाशिवाय भिकूला पाचित्तिय या नावाने ब्याण्णव निर्बंध पाळावे लागतात.
भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम
१) भिक्खूचे वर्तन चांगले असावे. त्याची चालचलणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी.
२) यासाठी भगवंतांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत.
३) शिष्टाचाराच्या नियमांना सेखिय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर पंचाहत्तर आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: