गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; कुटुंबीयांचा घातपाताचा आरोप
Автор: Lokasha tv - लोकाशा टीव्ही
Загружено: 2025-09-11
Просмотров: 194
Описание:
Join this channel to get access to perks:
/ @lokashatv गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; कुटुंबीयांचा घातपाताचा आरोप
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 34) यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी बार्शी तालुक्यातील सासूर गावात त्यांच्या गाडीत मृतदेह आढळला. त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पोलिसांनी सांगितले. मात्र, बर्गे यांच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून नियोजित कट असल्याचा ठाम दावा केला आहे.
गोविंद बर्गे यांचे कला केंद्रात काम करणाऱ्या पूजा गायकवाड (वय 21) हिच्याशी प्रेमसंबंध होते. गेल्या दीड वर्षांपासून त्यांचे संबंध सुरू होते. मात्र, अलीकडे या दोघांमध्ये वाद वाढले होते. पूजा गायकवाडने बर्गेंना त्यांचा गेवराईतील नवीन बंगला आपल्या नावावर करण्याची मागणी केली होती. तसे न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी तिने दिल्याचे समोर आले आहे. यामुळे बर्गे गेल्या काही महिन्यांपासून तणावाखाली होते.
सोमवारी रात्री बर्गे सासूर गावातील पूजाच्या घरी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या गाडीत गोळी लागलेला मृतदेह सापडला. या घटनेनंतर पोलीस तपासात गुंतले असून, घटनास्थळी दारुच्या बाटल्या आढळल्या आहेत. परंतु बर्गे यांच्या नातेवाईकांनी त्यांना कोणतेही व्यसन नसल्याचा दावा करत पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गोविंद बर्गे यांच्या भाच्याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “माझ्या मामाकडे कधीही बंदूक नव्हती. तो साधा, निर्व्यसनी माणूस होता. हे सर्व घडामोडी राजकीय दबावाखाली घडवून आणल्या आहेत. काही लोकांनी कट रचून मामाला फसवलं आहे.” तसेच, गाडीत टाकण्यात आलेल्या दारुच्या बाटल्या ही सुद्धा पुरावा वळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी शिरून डाव्या बाजूने बाहेर पडली होती. त्यामुळे ही घटना आत्महत्या आहे की घातपात, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांकडून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. त्या अहवालानंतर घटनेचे खरे स्वरूप स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, बर्गे यांच्या मृत्यूमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. स्थानिक पातळीवर विविध चर्चांना उधाण आले आहे. कुटुंबीयांचे आरोप, पूजाचे वादग्रस्त विधान आणि राजकीय संबंध या सर्व गोष्टींमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी गडद झाले आहे. येत्या काही दिवसांत तपासातून काय निष्कर्ष येतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: