खुशखबर ! कराडच्या सहापदरी उड्डाण पुलावर डांबरीकरण सुरू |
Автор: Karad Today
Загружено: 2026-02-13
Просмотров: 6239
Описание:
Good news! Asphalting begins on Karad's six-lane unique flyover #nh48 #nhai #nitingadkari #karad #gatishakti #karadflyover #sixlaneflyover #news #karadnews #goodnews #adani #dpjain #dpj #highwayconstruction #sixlaneroad #roadwork #satarakagal #flyovernews #karadtodaynews #rajusanadikarad #karadtoday #rajusanadi #youtube #youtubenews #youtubevideo #youtubechannel #marathinews
पुणे बेंगलोर महामार्गावर अखेर सहा पदरी युनिक उड्डाणपुलावर शेवटचा टप्पा म्हणजेच डांबरीकरण करण्यास विधीवत पूजा करून आज प्रारंभ करण्यात आला आहे. आदानी तसेच डी पी जैन कंपनीच्या अधिकारी, इंजिनियर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
2025 मध्ये उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे गेल्याने पुलावरील कामास सुरुवात करण्यात आली होती. दोन महिन्यापासून पुलाच्या एका लेनवर मास्टिक पॅड टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
आता प्रत्यक्षात अंतिम टप्प्यातील डांबरीकरण करण्यास आज 13 फेब्रुवारी रोजी प्रारंभ करण्यात आला आहे. हॉटेल ग्रीन पार्क पासून ते रिलायन्स पंपापर्यंत पिलर क्रमांक एक ते 24 दरम्यान दरम्यानच्या पुलावर एका लेनमध्ये 14 मीटर रुंदीचे हे डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसात साधारण एक किलोमीटर अंतरावरील डांबरीकरण पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे लवकरच हा उड्डाणपूल वाहतुकीला खुला करण्याच्या दृष्टीने ठेकेदार कंपनीने हालचाली सुरू केल्या आहेत. दोनच दिवसापूर्वी कराड टुडे न्यूज ने या पुलावरील संत गतीने सुरू असलेल्या कामाबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: