कपाशीवरील दहिया रोगाचे व्यवस्थापन | Management of Dahiya Disease of Cotton
Автор: RFInformationServices
Загружено: 2023-09-07
Просмотров: 1510
Описание:
@RFInformationServices
कपाशीवरील दहिया रोगाचे व्यवस्थापन | Management of Dahiya Disease of Cotton
नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण येथे दहिया या रोगविषयी त्याची लक्षणे तसेच त्याचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे याविषयी माहिती घेऊया. दहिया हा जो रोग आहे हा बुरशीजन्य रोग असून रामुलारिया एरिओला या बुरशीमुळे हा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. यामध्ये लक्षणांमध्ये मुख्यत्वे जुन्या पानांवर वातावरणातील तापमान कमी झाले की पांढऱ्या रंगाची बुरशी वाढते तसेच रोगग्रस्त पाने दही शिंपडल्या सारखे आपल्याला दिसतात. तसेच या रोगामध्ये लक्षणांमध्ये प्रामुख्याने सुरवातीला पानांवर अनियमित टोकदार पांढरट असे 1-10 मी.मी. आकाराचे चट्टे पानांच्या शिरांभोवती आढळून येतात आणि पांढऱ्या रंगाच्या बुरशीचा साधारणतः पानांच्या खालच्या बाजूस अधिक प्रादुर्भाव होतो. या रोगाचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास पानांची मोठ्या प्रमाणात गळ आपल्याला दिसून येते. यासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापन पद्धतीमध्ये मुख्यत्वे स्वयंअंकुरीत कपाशीची झाडे उपटून टाकून प्रादुर्भाव ग्रस्त अवशेष जाळून नष्ट करायला पाहिजे त्यानंतर आपण नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळायला पाहिजे. तसेच लागवड शिफारशीत असलेल्या वानानुसर करावी. सुरवातीस या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास दहिया बुरशीचा संसर्ग व पानांवरील टिपके रोकण्यासाठी कोणतेही सी.आय.बी.आर.सी. द्वारे शिफारस केलेले आहे असे बुरशीनाशक वापरावे. धन्यवाद.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: