कीर्तन सेवा- स भ मकरंदबुवा रामदासी- पुणे - ३४४ वा दासनवमी महोत्सव २०२६
Автор: Sajjangad Sansthan
Загружено: 2026-02-08
Просмотров: 119
Описание:
दासनवमी महोत्सव श्रीसमर्थाची पुण्यस्मरण तिथी अर्थात श्रीदासनवमीच्या निमित्ताने सज्जनगडावर दरवर्षी भव्य स्वरूपात उत्सव साजरा केला जातो. माघ वद्य प्रतिपदा ते माघ वद्य दशमी असे दहा दिवस हा उत्सव संपन्न होतो. दररोज श्रीसमर्थ समाधी मंदिरातील दरबारात श्रीसमर्थ समाधी समोर नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार, गायक, वादक, आदी भक्त आपली सेवा श्रीसमर्थ चरणी रुजू करतात. महापूजा, सांप्रदायिक भजन, छबिना, तेरा प्रदक्षिणा, सुंदरकांड, उपासना, दासबोध वाचन, इत्यादी धार्मिक उपक्रमात देखील भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. दासनवमीच्या मुख्य दिवशी पहाटे महापूजा पार पडून गडावर भिक्षेचा कार्यक्रम होतो. त्यानंतर माध्यान्ह समयी श्रीसमर्थ निर्याण कथेचे श्रवण करून देशाच्या विविध भागातून आलेले हजारो भक्त श्रीसमर्थ महाप्रसादाचा लाभ घेतात. दशमीस लळीत किर्तनाने उत्सवाची सांगता होते.
@sajjangadsansthan
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: