एस. टी बस नवीन नियम | Positive thinker vlog |
Автор: Positive_Thinker
Загружено: 2026-02-13
Просмотров: 1482
Описание:
एस. टी बस नवीन नियम | Positive thinker vlog | #vlog#new
आता केवळ ओळखपत्र दाखवून अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याचे दिवस संपले आहेत. तुम्हाला यापुढे स्मार्ट कार्ड घ्यावे लागेल. कारण, राज्य सरकारकडून सवलतीत प्रवास करणार्यांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) आणले आहे. सवलतीत प्रवास करताना यापुढे फक्त ओळखपत्र दाखवून चालणार नाही, तर तुमच्याकडे एनसीएमसी कार्ड असायलाच हवं, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या स्मार्टकार्डबाबत केली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावटगिरीला आळा घालण्यासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) प्रणाली बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती देताना स्पष्ट केले आहे की, यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ केवळ याच स्मार्ट कार्डद्वारे दिला जाईल. याचाच अर्थ असा की, जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल, तर तुम्ही सवलतीसाठी पात्र असूनही तुम्हाला पूर्ण दराने तिकीट खरेदी करावे लागेल. जुन्या पद्धतीच्या ओळखपत्रांवर आता सवलत मिळणे कठीण होणार आहे
हे कार्ड केवळ प्रवासासाठीच नाही, तर एका डिजिटल वॉलेटप्रमाणे काम करेल. कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी त्यामध्ये किमान 100 रुपयांचा बॅलन्स असणे आवश्यक आहे. त्यानंतर गरजेनुसार 50 रुपयांच्या पटीत कितीही रिचार्ज करता येईल. प्रवाशांना रिचार्जसाठी कुठेही लांब जाण्याची गरज पडणार नाही; बसमधील ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडे ही सुविधा उपलब्ध असेल. यामुळे प्रवासात सुट्या पैशांसाठी होणारी वादावादी आता कायमची थांबणार आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: