#Ratnagiri
Автор: kokan maza कोकण माझा
Загружено: 2025-10-19
Просмотров: 20870
Описание:
#दाभोळ खाडीत महाराष्ट्रातील पहिली “हाऊस बोट” – कोकणात पर्यटनाचा नवा अध्याय!
हाऊसबोट म्हटलं की डोळ्यासमोर येते केरळची अल्लेप्पी बॅकवॉटर किंवा काश्मीरची डल लेक… पण आता अशीच आलिशान हाऊसबोट आपल्या महाराष्ट्रात, तीही कोकणात अवतरली आहे!
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीत ‘सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीतर्फे राज्यातील पहिला हाऊसबोट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प कोकणातील पर्यटन क्षेत्रासाठी नवा मैलाचा दगड ठरणार आहे.
दाभोळची विस्तीर्ण, शांत आणि नयनरम्य खाडी आता पर्यटकांना एका वेगळ्याच अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाणार आहे. समुद्राच्या पाण्यावर तरंगणाऱ्या या हाऊसबोटमध्ये आहे — एसी रूम्स, प्रशस्त बेडरूम, किचन, डायनिंग हॉल, आणि कोकणी चवीच्या पदार्थांनी भरलेलं आकर्षक रेस्टॉरंट!
एकूण ८ सुसज्ज रूम्ससह ही महाराष्ट्रातील पहिली आणि सर्वात आधुनिक हाऊसबोट ठरली आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक अविस्मरणीय लक्झरी अनुभवयात्रा ठरणार आहे.
या प्रकल्पाचं भव्य उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडलं, तर माजी आमदार डॉ. विनय नातू आणि संजय यादवराव प्रमुख उपस्थित होते.
🌅 कोकणातील पर्यटनाला नवी झळाळी देणारा हा प्रकल्प स्थानिक रोजगारालाही मोठी चालना देईल.
दाभोळ खाडी आता केवळ समुद्री सौंदर्यापुरती मर्यादित न राहता – ती बनली आहे कोकणची नवी ‘डल लेक’! 🚤❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: