हत्तीने शिकवला दुकानदाराला धडा | मराठी गोष्टी | लहान मुलांच्या कथा | Marathi kids Children's stories
Автор: लहान मुलांच्या गोष्टी
Загружено: 2023-09-21
Просмотров: 199
Описание:
एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता. सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला खाऊ घालत असत. सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्यला जीव लावत असे.हत्ती रोज साकळी गावातील मंदिरात जात असे. रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे. दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे. हत्ती तो फुले सोंडेत घेऊन मिरवत मिरवत नेऊन मंदिरात जाऊन - देवाच्या चरणी वाहत असे. हत्ती ज्याप्रकारे फुले मिरवीत नेणे आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने बघत असत. लोक हत्तीचे कैतुक करत असे. हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय झाला होता.एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता. रोजच्या सवयी प्रमाणे हत्ती दुकानात आला. निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्यावजी त्यच्या सोंडेला सुई टोचली. दुकानदारने कारण नसतानाही स्वताचा राग हत्तीवर काढला. हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखवला गेला व त्याला त्या दुकानदाराचा राग आला.आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकविण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानच्या जवळून वाहणाऱ्या ओढयाच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले.हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला. हत्तीने ते घाणरडे पाणी दुकानदार, फुले आणि हरांवर फवारले. दुकानदाराचा सगळा माल खराब झाला. त्याला स्वताची चूक कळून आली. मात्र त्यसाठी त्याला मोठी किमंत मोजावी लागली.
तात्पर्य - जसाच तसे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: