चमचमीत आणि चविष्ट पावटा भात | Pawta Bhat मसालेदार पावटा भात pawta bhat recipe
Автор: CREATIVE MINDS STUDIO
Загружено: 2026-02-23
Просмотров: 66
Описание:
साहित्य:
1 वाटी बासमती तांदूळ (धुऊन घेतलेले)
अर्धी वाटी ताजे पावट्याचे दाणे
1 बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर
1 टेबलस्पून तेल
मोहरी आणि जिरे
खडे मसाले – 1 तमालपत्र, 2–3 लवंगा, 1 सुकी लाल मिरची
अर्धा टीस्पून हळद
अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर
आलं-लसूण-मिरची पेस्ट
काही काजूच्या पाकळ्या
मीठ चवीनुसार
3 वाट्या पाणी
कृती:
सर्वप्रथम एका छोट्या कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात तमालपत्र, लवंगा आणि सुकी लाल मिरची असे खडे मसाले घाला.
यानंतर मोहरी आणि जिरे घाला. जिरे तडतडले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्या. कांदा गुलाबी झाला की त्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
आता त्यात आलं-लसूण-मिरची पेस्ट आणि काजूच्या पाकळ्या घालून चांगले परतून घ्या.
यानंतर ताजे पावट्याचे दाणे घाला आणि 2–3 मिनिटे परतून घ्या. आता त्यात हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करा.
आता धुतलेला बासमती तांदूळ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्या.
यानंतर 3 वाट्या पाणी घाला, हलक्या हाताने ढवळा आणि कुकरचे झाकण लावा. मध्यम आचेवर 3 शिट्ट्या होऊ द्या.
गॅस बंद करून वाफ जाऊ द्या.
बघा, आपला गरमागरम पावटा भात तयार आहे! वरून थोडीशी कोथिंबीर घाला. हा भात पापड, तळलेली मिरची किंवा कोणत्याही लोणच्यासोबत खूपच छान लागतो.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
कमेंटमध्ये नक्की सांगा, पुढे तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल.
धन्यवाद! पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. 😊
masala bhatachi recipe
masala bhatachi marathi recipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: