आज आमच्या जिल्हा परिषद शाळा मांजरबर्डी येथे अतिशय आणि उत्साहात बाल आनंद मेळाव्याचे सुंदर
Автор: Seruu_Kanoje_18
Загружено: 2026-01-18
Просмотров: 52
Описание:
आज आमच्या जिल्हा परिषद शाळा मांजरबर्डी येथे अतिशय आणि उत्साहात बाल आनंद मेळाव्याचे सुंदर व यशस्वी आयोजन करण्यात आले..
मागच्या शनिवारी शाळेत माता पालक, शालेय व्यवस्थापन समितीची संयुक्त बैठक घेण्यातआली व सर्वानुमते या वेगळ्या कार्यक्रमाची आखणी झाली.
पालकांनी अतिशय उत्साहात कार्यक्रम करायची तयारी दर्शविली.
अग्रस्थानी नेहमी प्रमाणे कैलास भाऊ यांनी कार्यक्रम कसा असेल याचा आढावा घेतला..
मुलांना आठवडाभर आदरणीय ढिवरे सर यांनी मार्गदर्शन केले..
आणि आज आनंदाचा व छोटी का असेना पर्वणीचा दिवस आला...
अगदी सकाळी 7 वाजता सर्व मुले शाळेत हजर होती...
शाळेचा मुख्य घटक असलेले सखाराम पावरा सर, कैलास भाऊ यांनी अर्धा तासात टेन्ट लावून दिला... अजूनही बरेच मित्र होते..
टेन्ट चि व्यवस्था आदरणीय राकेश भाऊ ( वाकपाडा यांनी केली होती ).. अशोक भाऊ कढरे यांनी स्वतःच्या वाहनात टेन्ट साहित्य आणून दिले...
अगदी 8..30 पर्यंत कार्यक्रम साठी शाळा सज्ज झाली होती.. मुलांसोबत पालक सुद्धा खूप उत्साहात होते...
आदरणीय केंद्र प्रमुख प्रकाश भामरे सर अगदी ठरल्या वेळी उपस्थित झाले..
आदरणीय प्रकाश दादा रावताळे, पोलीस पाटील भरत दादा, आमचे स्नेही सखाराम दादा, राकेश भाऊ आणि सर्व स्नेहांकित मित्र सुद्धा लवकरच आले..
मान्यवरांच्या हस्ते थोर व्यक्तींचे पूजन करण्यात आले.. व सत्कार समारंभ सुद्धा करण्यात आले..
आणि प्रत्यक्ष बाल आनंद मेळावा सुरु झाल्याचे घोषित करण्यात आले..
विध्यार्थी मित्रांनी अनेक प्रकारचे पकवान, व्यंजन तयार केली होती..
खूपच चवदार पदार्थ होते आणि रुचकर सुद्धा.. सर्व आदरणीय मित्र, स्नेही पदार्थाचा आस्वाद घेत होते... काही मित्रांनी भाव कमी करा म्हणून आग्रह पण धरला पण भाव करतील ते मांजरबर्डी चे विध्यार्थी कसे ( त्यांचे मुख्याध्यापक स्वतः व्यापारी आहेत,, एवढे तर शिकवणार ना ) कमी भावात एकही वस्तू नाही दिली मुलांनी.
जास्त भावात का असेना पण पूर्ण पालक वर्गाने भरभरून मुलांच्या कौतुकासह वेगवेगळ्या खाद्य पदार्थावर ताव मारला..
पाणी पुरी, वडापाव, भजी, कचोरी, इडली सांबार, गुलाब जाम, चिवडा, पापड -पोंगे, वरण भट्टी, खिचडी, गोड भजी ( गुव्वा गुंडा ) आणि असे अनेक पदार्थ जिभेला चटक देत होत्या खूप खूप मज्जा होती... काही विध्यार्थी मित्रांनी मग आदिवासी गाण्यावर ठेका धरला व डान्स केला..
आदरणीय प्रमुख पाहुणे तर खूपच भारावून गेले त्यांनी मुलांचे खूप कौतुक केले...
या आनंदाच्या क्षणात दुपारचे बारा केव्हा वाजले कडलेच नाही.. बऱ्याच मुलांचे पदार्थ विकले गेले काहींचे कमी विकले गेले.. पण अनुभव मात्र सगळ्याच मुलांना मिळाला.. आपण आपले पदार्थ कसे विकले कोणी किती घेतले कोणी जादाचे पैसे दिले, कोण उचलून खात होता, कोणी फुकट, उधार खाल्ले या चर्चा रंगल्या व विनोद होऊ लागले... काही मुलांनी अगदी हुशार व्यापाऱ्या सारखे विनंती करून सुद्धा माल विकल्याचे कळत होते आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून गुरुजन सुद्धा भारावून गेले..
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश दादा यांचे अंतिम टप्प्यातील मार्गदर्शन तर एक नवीनच ऊर्जा देऊन गेले,, दादांचा एकन एक शब्द खूप काही सुंदर संदेश देऊन जात होता...
एकूणच खूप मजेशीर आणि आनंदात आजचा अविस्मरणीय दिवस होता... पुन्हा असेच कार्यक्रम होत राहतील आणि मुलांना ज्ञान, ऊर्जा आणि बळ मिळत राहील यात शंका नाही 💐💐🙏🙏💥💥💥💥💥💥💥
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: