एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभर संपाचा इशारा; वेतन फरक आणि भत्त्याचा प्रश्न | MSRTC Strike | Saam TV
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-07
Просмотров: 3427
Описание:
महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. वेतन मिळाले असले तरी, वेतनातील फरक आणि थकीत मासिक भत्ता न मिळाल्यामुळे कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेने राज्य सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी दिला आहे. जर या तीन दिवसांत वाढीव रक्कम आणि भत्त्यांबाबत सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर राज्यभर एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संभाव्य संपामुळे राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या या पवित्र्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एसटी सेवा विस्कळीत झाल्यास ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
#MSRTC #STStrike #MaharashtraNews #SaamTV #STKarmachari #TransportNews #MSRTCUpdate #MarathiNews #PublicTransport #STBus #MaharashtraGovernment #StrikeAlert #BusService #MSRTCProtest #BreakingNewsMarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: