अक्षरगणवृत्त - कलापति | पांडुरंग पांडुरंग वेड लागले | Pandurang Pandurang | Shubhangi Koparkar
Автор: Shubhangi Koparkar
Загружено: 2025-07-05
Просмотров: 4942
Описание:
नमस्कार! मी शुभांगी कोपरकर.
कविता करणे आणि कविता म्हणणे हा माझा आवडता छंद.
आजच्या भागात मी कलापति या सुंदर अक्षरगणवृत्तातील एक रचना सादर केली आहे.
आवर्तनी अक्षरगणवृत्तांच्या घारि वर्गातील अतिशय गोड लय असलेले हे वृत्त आहे.
अक्षरगणवृत्त - कलापति
एकूण अक्षर संख्या = १३
गाल गाल गाल गाल गाल गाल गा
पांडुरंग पांडुरंग वेड लागले
नामघोष कीर्तनात भक्त रंगले || ध्रु ||
पंढरीत पालख्या विसावल्या किती
लाभली निवांत आज संत संगती
पाहतास विठ्ठलास धन्य जाहले || १ ||
झांज गुंजते मृदंग टाळ वाजती
काळजात लक्ष लक्ष दीप तेवती
वंदुनी पदास अष्टभाव दाटले || २ ||
नेत्र घेतले मिटून तृप्त अंतरी
प्राण पांडुरंग आणि देह पंढरी
धन्य होइ जन्म एकरूप जाहले || ३ ||
••••••••••••••••••••••••••••••
लहानपणी शिकलेल्या अनेक कविता आजही पाठ आहेत. त्या कवितांचे सौंदर्य त्यांच्या वृत्तबद्ध रचनेत आहे. मराठीत असंख्य वृत्त आहेत. त्यांचे मात्रावृत्त, अक्षरगणवृत्त, अक्षरछंद असे मुख्य प्रकार आहेत. या चॅनेल वर मी स्वतः केलेल्या विविध वृत्तातील कविता सादर करणार आहे. कधीतरी मुक्त छंदातील रचनादेखील सादर करेन.
प्रत्येक वृत्ताविषयी थोडी माहिती देऊन वृत्ताची लय समजावून सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. वृत्तबद्ध कविता करणे हे खूप क्लिष्ट आहे, अवघड आहे किंवा त्यात कृत्रिमता असते असे बरेच गैरसमज अनेकांच्या मनात असतात. पण माझ्या कविता ऐकल्यावर त्यातील सुलभता आणि गंमत तुम्हा सर्वांना नक्कीच जाणवेल. अनेकांनी वृत्तबद्ध रचनेकडे वळावं, त्यातील मौज अनुभवावी असं मला वाटतं. आणि वाचताना देखील त्यातील ऱ्हस्व - दीर्घ वर्णांचं भान कसं ठेवायला हवं हे देखील श्रोत्यांना कळेल. मात्रावृत्त रचताना लघु म्हणजे ऱ्हस्व अक्षराची १ मात्रा आणि गुरू म्हणजे दीर्घ अक्षराच्या २ मात्रा धरायच्या. त्यानुसार मात्रांची बेरीज वृत्ताच्या सूत्रात ( फॉर्म्युला) बसेल अशी शब्दरचना करायची.
अक्षरगणवृत्तात एकूण अक्षरसंख्या ठराविक असतेच पण त्यातील ऱ्हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम ठराविक असतो. त्याला लगावली असे म्हणतात. लगावली नुसार वृत्ताची लय बदलते. कवितेचे सौंदर्य त्यात सामावलेले असते.
#pandurang #vithalrukamai #vaari #ekadashi #pandharpurwari #marathikavitaprem #marathipoet
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: