दुर्गा नारायण भागवत - माहिती मराठी / durga narayan bhagwat - infornation in marathi
Автор: KUBER CLASSES
Загружено: 2025-08-03
Просмотров: 341
Описание:
दुर्गा भागवत (जन्म : इंदूर, १० फेब्रुवारी १९१०; - मुंबई, ७ मे २००२) या मराठी लेखिका होत्या. ९२ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांना फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही लेखन आहे.
१९७५ साली इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला स्पष्ट विरोध करणाऱ्या म्हणून दुर्गाबाई विशेष मान्यता पावलेल्या आहेत.
#kuberclasses
#durganarayanbhagwat
#दुर्गानारायणभागवत
#_दु_ना_भागवत
#_d_n_bhagwat
#durga_bhagwat
दुर्गा भागवत यांचे मूळ गाव पंढरपूर होय. पण त्यांच्या आजोबांनी दुर्गाबाईंच्या आईला दिलेल्या वाईट वागणुकीची चीड येऊन त्यांनी पंढरपूर कायमचे सोडले. शालेय शिक्षण मुंबई, नगर, नाशिक, धारवाड, पुणे येथे. १९२७ साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाले. १९३२ मध्ये त्या पहिल्या वर्गात बी.ए. (संस्कृत व इंग्रजी) झाल्या. १९२९ साली शिक्षण स्थगित करून दुर्गा भागवत यांनी महात्मा गांधींच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला. १९३५ मध्ये त्या एम्.ए. झाल्या. त्यासाठी 'इंडियन कल्चरल हिस्टरी' शाखेत 'अर्ली बुद्धिस्ट ज्युरिसप्रूडन्स' या विषयावर त्यांनी प्रबंधलेखन केले. पीएच्.डी.च्या प्रबंधासाठी 'सिंथिसिस ऑफ हिंदू अँड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्सेस ऑफ इंडिया' या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले; परंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाला होता. महात्मा गांधी, टॉलस्टॉय, हेनरी डेव्हिड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजारामशास्त्री भागवत, डॉ. श्री.व्यं. केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रेरणास्थाने होती.
दुर्गाबाईंचे वडील शास्त्रज्ञ होते.भारताच्या आद्य स्त्री-शास्त्रज्ञ कमला सोहोनी या दुर्गा भागवतांच्या भगिनी होत्या. आचार्य राजारामशास्त्री भागवत हे दुर्गाबाईच्या आजीचे बंधू होते.
सुस्पष्ट पामाणिक विचार, छोटी छोटी वाक्ये, नादमय शब्द आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. दुर्गाबाईंच्या लेखनात भारतातील सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ अभ्यासपूर्वक नोंदविलेले दिसतात. अभ्यास आणि लिखाण हे त्यांचे आस्थेचे विषय होते. म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयींचा अपूर्व संगम आढळतो. त्यांच्या लिखाणात स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांबरोबरच कवी मनाची कोमलता आढळते. आणि "आपणाला जे जे ठावे ते इतरांना सांगावे" हा समर्थ रामदासांचा विचार प्रत्यक्षात आणण्याची तळमळ दुर्गाबाईंमध्ये दिसून येते. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेत हा ठामपणा दिसून येतो. लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलभाषेची मांडणी आढळते, तसेच व्यासंग-चिंतन-मनन यांतून आलेले त्यांचे विचारही त्यांच्या साहित्यात दिसून येतात. दुर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता, अस्सल भारतीयत्व, सनातनत्व यांचा वेध घेण्याची शक्ती यांमुळे ललित निबंधाच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला आहे. फ् पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी दोन वर्षे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या त्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या. भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशिया भेटीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. कऱ्हाड येथे १९७५ साली झालेल्या ५१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
"पैस", "ॠतुचक्र", "डूब", "अशा ललित लेखांच्या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. बाणभट्टाची "कादंबरी","जातककथा", यांचा अनुवाद करणाऱ्या दुर्गाबाईंनी थोरो या अमेरिकन विचारवंताच्या पुस्तकाचा " वॉल्डनकाठी विचारविहार "नावाचा अनुवादही केला. रवींद्रनाथ टागोरांच्या "गीतांजली"चा संस्कृतात अनुवाद करण्याचे कौतुकास्पद कार्य दुर्गाबाईंनी केले. त्यांनी भाषांतरित केलेली आणि सरिता प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेली 'लोककथामाला' मराठीतील लोककथा आणि बालकथा यांमधला महत्त्वाचा ठेवा आहे.
खालील पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे.
ऋतुचक्र
डूब
पैस (विठ्ठलासंबंधीचा लोककथासंग्रह)
भावमुद्रा
व्यासपर्व
रूपरंग
१९७१चा साहित्य अकादमी पुरस्कार – 'पैस' साठी.
दुर्गाबाईंनी इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ त्यांच्या सरकारने देऊ केलेले पद्मश्री आणि ज्ञानपीठ हे पुरस्कार नाकारले.
#दुर्गानारायणभागवतमाहितीमराठी
#durganarayanbhagwatmarathimahiti
#durganarayanbhagwatinformationinmarathi
#_दु_ना_भागवत_माहितीमराठीमध्ये
#_d_n_bhagwat_yanchimahiti
#_d_n_bhagwat_marathiinformation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: