सांगली ते पुणे With MSRTC Bus Journey Vlog ||Sangli ||Pune ||Swargate || MSRTC || Vlog|| ipl ||
Автор: Nomadic Pravasi
Загружено: 2022-04-11
Просмотров: 33031
Описание:
Sangli .......
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. सांगलीचे गणपती मंदिर हे खाजगी असल्यामुळे त्याचा सर्वा खर्च श्रीमंत पटवर्धनराजे हे करतात.
सांगलीची इ.स.२००८ सालची लोकसंख्या ५,०२,६९७ च्या आसपास आहे. हे शहर सांगली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ते कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.
मुख्य भाषा मराठी असून कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषाही येथे बोलल्या जातात. आद्य मराठी नाटककार विष्णूदास भावे यांची ही जन्मभूमी आहे. सांगली संस्थानाचे तत्कालीन राजा, चिंतामणराव पटवर्धन ह्यांच्या पुढाकाराने संस्थानामध्ये ('सीतास्वयंवर)' ह्या संगीत नाटकाचं पहिल्यांदाच सादरीकरण करण्यात आलं जे विष्णूदास भावे ह्यांनी लिहिलं आणि दिग्दर्शित केलं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक ह्या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली त्यामुळे सांगलीला ("नाट्यपंढरी") ह्या नावानेही संबोधलं जातं. सांगलीच्या पटवर्धन संस्थानचे भव्य गणेश मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मंदिर आहे.
Pune .......
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{संदर्भ हवा}.या शहराचे जुने नाव पुनवडी ऊर्फ पूर्वणी असे होते.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले हे शहर आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. [मराठी भाषा|मराठी] ही शहरातील एकमेव मुख्य भाषा आहे. सांस्कृतिक शहर म्हणून पुणे शहराला एक वेगळी ओळख आहे विद्येचे माहेरघर म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे
ऐतिहासिक स्थाने :- लाल महाल, तुळशीबाग, शनिवारवाडा, विश्रामबाग वाडा, चतुशृंगी मंदिर, महादजी शिंद्याची छत्री इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.सर्वांनी भेट द्यावीत अशी ठिकाणे आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत.
#travel #vlog #sangli #pune #swargate #msrtc #stbus
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: