आले लागवड खत व्यवस्थापन आले लागवड करताय ? आले लागवड व खत व्यवस्थापन संपूर्ण माहिती
Автор: Agrowone.com.Marathi
Загружено: 2020-07-28
Просмотров: 2129
Описание:
आले लागवड खत व्यवस्थापन आले लागवड करताय ? आले लागवड व खत व्यवस्थापन संपूर्ण माहिती जैविक खते
चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट @ 5-6 t/ha पेरणीच्या वेळी देणे. निंबोळी केक @ 2 t/ha चा वापर करणे फायद्याचे ठरते.आले पिकाला माती परिक्षणानुसार अन्नद्रव्यांचा संतुलित आणि प्रमाणशीर योग्य वेळेस वापर करावा. आले पिकाला प्रति एकरी ४८ किलो नत्र, ३० किलो स्फुरद, ३० किलो पालाश या अन्नद्रव्यांच्या मात्रांची आवश्यकता असते. यापैकी संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा जमीन तयार करतेवेळी द्यावी. नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून आले पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यांनी व उटाळणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावे. याशिवाय उटाळणी प्रति एकरी ६०० ते ८०० किलो निंबोळी पेंड किंवा करंज पेंड द्यावी.
लागवडीच्या वेळी 2 टन/ha निंबोळी पेंड जमिनीत घातल्यास कंद कूज, सूत्रकृमी यांच्यापासून पिकाचे संरक्षण होते.
रासायनिक खते.*DOWNLOAD APP --- https://play.google.com/store/apps/de...
WHATSAPP https://wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE https://agrowone.in/
📞📞 https://wa.me/919172800247
170 kg युरीया, 300 kg SSP व 80 Kg MoP प्रती हेक्टर द्यावे. संपूर्ण SSP व अर्ध्ये MoP पेरणीच्या वेळी द्यावे.
भर खते kg/ha. पेरणी नंतर 30,60,90 व120 दिवसांनी 25:25:18 ( 55 kg/ ha युरीया, 120 kg/ha सिंगल सुपर फोस्फेट, 30 kg/ha पालाश)
द्यावे.
संप्रेरके
उत्पादन वाढण्यासाठी व तंतूचे प्रमाण कमी करण्यासाठी युरीया@20gm/Ltr+ प्लॅनोफिक्स@0.4gm/Ltr 60व 70व्या दिवशी लागवडीनंतर फवारा
फुटव्याची संख्या वाढवण्यासाठी 200 ppm इथ्रेलची 75 व्या दिवसापासून 15 दिवसांच्या अंतराने 3 फवारण्या कराव्यात.
सुक्ष्म अन्नद्रव्ये
लागवडीच्या वेळी 6 kg झिंक (30 kg झिंक सल्फेट ) दिल्यास पिकाच्या उत्पादनास फायदा होतो.
कंद वाढीच्या काळात बोरॉन, लोह आणि झिंक कमतरता भरून काढण्यासाठी 375 gm फेरस सल्फेट, 375 gm झिंक सल्फेट, 375 gm बोराॅक्स, 375 gm युरीया 250 Ltr / ha पाण्यामध्ये मिसळून फवारा. दोन वेळा फवारणी करा.
किंवा
लागवडीनंतर 10-15 दिवसांनी 19:19:19 2.5 -3 ग्रॅम+सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 -3 ग्रॅम+चिलेटेड झिंक 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारा.
लागवडीनंतर 40-45 दिवसांनी चिलेटेड फेरस 1 ग्रॅम+सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 -3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारा.
लागवडीनंतर 4 महिन्यांनी 0:52:34 4-5 ग्रॅम+मायक्रोन्युट्रीएंटस् 2.5 -3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारा.
लागवडीनंतर 6 महिन्यांनी 2-3 वेळेस 0:52:34 4-5 ग्रॅम+बोरॉन 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारा.
लागवडीनंतर 8 महिन्यांनी 0:0:50 4-5 ग्रॅम+कॅल्शियम नायट्रेट 2-2.5 ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारा.
सिंचन
सिंचनाच्या पाळ्या
सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास, हवामान व मातीच्या प्रकारानुसार, 15-40 वेळा 7 - 10 दिवसांच्या अंतराने पाणी देणे.
पेरणी पुर्वी किंवा पेरणी नंतर पहिले हलके पाणी द्यावे. दुसरे पाणी पेरणी नंतर 3-4 दिवसांनी देणे. त्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या अंतराने देणे.
गरज असल्यास रुजवण होण्याच्या काळात 8-10 दिवसाच्या अंतराने व हलक्या जमिनीत 7-8 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देणे.
हिवाळ्यामध्ये पाण्याच्या पाळ्या 12-15 दिवसानी दिल्या जातात. काढणीच्या अगोदर 15 दिवस पाणी देऊ नये.
मध्यम वाढीच्या काळात भारी जमिनीत 4 वेळा सिंचन 10-12 दिवसाच्या अंतराने व हलक्या जमिनीत 6 वेळा सिंचन 7-8 दिवसाच्या अंतराने देणे.
सक्रिय वाढीच्या काळात भारी जमिनी मध्ये 6 वेळा 10-15 दिवसाच्या अंतराने पाणी देणे व हलक्या जमिनीत 10 वेळा, 7-8 दिवसाच्या अंतराने पाणी देणे.
शिथिल वाढीच्या काळात भारी जमिनीत 4 वेळा, 10-15 दिवसाच्या अंतराने तर हलक्या जमिनीत 8 वेळा, 7 ते 8 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या देणे.
तयार होण्याच्या काळात भारी जमिनिसाठी 4 वेळा, 10-12 दिवसाच्या अंतराने तर हलक्या जमिनीत 8 वेळा, 7-8 दिवसाच्या अंतराने पाणी देणे. ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक - / agrowone
📸 इंस्टाग्राम - / agrowone
ट्विटर - / agrowone
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: