मेरठ मेट्रो आणि नमो भारत ट्रेनचं उद्घाटन | PM मोदींकडून ₹12,930 कोटींचे प्रकल्प लोकार्पित
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2026-02-21
Просмотров: 772
Описание:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील शताब्दी नगर नमो भारत स्थानकावरून मेरठ मेट्रो आणि नमो भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर मेरठमध्ये सुमारे ₹12,930 कोटी खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार असून ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
भारताच्या पहिल्या Namo Bharat Regional Rapid Transit System च्या उर्वरित विभागांचंही उद्घाटन करण्यात येत आहे. यात दिल्लीतील सराय काले खान ते न्यू अशोक नगरदरम्यानचा 5 किमी मार्ग आणि उत्तर प्रदेशातील मेरठ दक्षिण ते मोदीपुरमदरम्यानचा 21 किमी मार्ग समाविष्ट आहे.
नमो भारत सेवा साहिबाबाद, गाझियाबाद, मोदीनगर आणि मेरठ यांसारख्या प्रमुख शहरांना दिल्लीशी जलद आणि सुलभ जोडणी देणार आहे. तसेच मेरठ साउथ ते मोदीपुरमदरम्यानच्या मेरठ मेट्रो सेवांचाही शुभारंभ करण्यात आला.
या प्रकल्पामुळे प्रादेशिक संपर्क, वेगवान प्रवास आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
#NamoBharat #MeerutMetro #PMModi #Infrastructure #UttarPradesh
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: