हळकुंड पासुन रोप निर्मिती (Preparation of Turmeric seedlings) / tarmric farming
Автор: Garva Agro Tourism Abloli
Загружено: 2020-05-09
Просмотров: 17897
Описание:
Garva Agro Tourism - Abloli
Kokan / कोकण
गारवा कृषी पर्यटन केंद्र - आबलोली-गुहागर
हळकुंडा पासुन रोप निर्मिती
साधारण पणे 10 गुंठा क्षेत्रासाठी 250 /300 किलो हळद बियाणे लागते. बियाणे खरेदी साठी साधारण पणे 15000/- ते 25000/- रुपये खर्च हा पहिल्याच वर्षी येत असतो. हा खर्च एकाच वर्षी करावा लागतो. व पुढील अनेक वर्षे आपण बियाणे आपल्याच शेतातील वापरत असतो. पण काही शेतकरी येवढा खर्च करु शकत नाही.किंवा एवढे बियाणे काही वेळा उपलब्ध होत नाही. मग अश्या वेळी काय करावे हे शेतकर्यांना समजत नाही किंवा दिशा सापडत नाही. अश्या वेळी आपण हळकुंडा पासुन रोप निर्मिती करुन हळदीची लागवड करु शकतो.
सर्व साधारण पणे हळदची लागवड ही अक्षय तृतीया पासुन करतात पण आपण हळदीची लागवड ही जुन मध्ये पाऊस सुरु झाल्यावर करतो हळद पिकची काढणी ही मार्च मध्ये केली जाते.हळद काढणी केल्यावर हळद ही सुप्ताअवस्थेत असते.हळदीची सुप्ताअवस्था ही एप्रिलमध्ये संपुन नविन अंकुर फुटण्यास सुरवात होते. आपणतर हळद लागवड ही जुन मध्ये करणार.मग मधला कालावधी 1.5 महीना आपल्या मिळतो अश्या कालावधीमध्ये आपण हळदीची रोपे तयार करु शकतो.
हळदीची रोपे ही तयार करण्यात साठी योग्य वेळ म्हणजे 15 एप्रिल ते 20 एप्रिल शक्यतो याच कालावधीत रोपे तयार करावी. जेणे करुन हळद लागवडी पर्यंत आपणास 1.5 / 2 महीना वयाची रोपे मिळतील.
हळद रोपे निर्मिती साठी कोणती साधन सामग्री आवश्यक असते. 1)रोपे निर्मिती साठी प्रो ट्रे .हा काळ्या रंगाचा 50 कप्पे असलेलाच असावा. 120 रोपे होणारा घेऊ नये. 2) कोकोपिठ केक 3)धार-धार सुरी 4)हळद काढण्यासाठी लाकडी फळी 5)बाविस्टीन पावडर 6)हळकुंड
साधारणपणे 10 गुंठा क्षेत्रासाठी 3000रोपे आवश्यक असतात.व ही 3000रोपे तयार करण्या साठी 30/35 कीलो हळकुंड आवश्यक असते. कोकोपिट चा केकच घ्यावा.पिशवी मध्ये 25 कीलो सुठ्ठ असत ते घेऊ नये.साधारण पणे 3000 रोप निर्मिती साठी 5 कीलोचा एक केक या प्रमाणे 5 केक लागतील.(25 कीलो).
रोपे निर्मिती करण्याच्या आदल्या दिवशी कोकोपिट चा केक मोठ्या पाण्याच्या ड्रम मध्ये भिजत टाकुन ठेवा.तो पाण्यात चांगला फुगला की मग रोपे निर्मिती साठीप्रो ट्रे मध्ये वापरावा.रोपे निर्मिती साठी हळकुंड छोटे-छोटे कटिंग करावे लागतात.हे कटिंग करतांना हळकुंडाच्या वर जे डोळे असतात ते बघुन करावे लागतात. कटिंग केलेल्या भागात एक तरी डोळा असायलाच पाहीजे.हे कटिंग केलेले हळकुंडाचे तुकडे 10लीटर पाण्यात 10 ग्राम बाविस्टीन पावडर टाकून या द्रावणातुन बुडवून काढावेत.त्यानंतर पाण्यात भिजलेल कोकोपिट ट्रे मध्ये भरावे.त्यामध्ये एक हळकुंडाचा तुकडा ठेवावा.व पुन्हा कोकोपिट टाकुन तो हळकुंडाचा तुकडा झाकुन घ्यावा.हळकुंड चा तुकडा ट्रे मध्ये ठेवतांना डोळ्या वरच्या बाजूला येईल याची काळजी घ्यावी.
असे ट्रे 50 % उन व 50%सावलीच्या ठिकाणी ठेवून नियमीत झारीने पाणी द्यावे. हे ट्रे पुर्णपणे सावलीला ठेऊ नका. साधारणपणे 15दिवसात रोपांना पान दिसण्यास सुरुवात होईल. अशी रोपे पाऊस सुरु झाल्यावर लागवड करावी.
SK Group
सचिन कमळाकर कारेकर
SK-4 (स्पेशल कोकण-हळद)
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: