बैलपोळ्याशी निगडित दोन पौराणिक कथा | bailpola | bail polyachi gost
Автор: परंपरा परमार्थाची
Загружено: 2023-09-12
Просмотров: 1152
Описание:
bail pola, bail polyachi gost #bailpola #bendur
bailpola katha (bail pola katha):
राम कृष्ण हरी मंडळी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे बैलांची शेती करण्यात विशेष योगदान आहे. त्यामुळे पोळा हा एक दिवस आहे ज्या दिवशी शेतकरी गायी व बैलांची आभार मानण्यासाठी पूजा करतात. पोळा हा सण विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर पोळा हा सण श्रावण महिन्यातील अमावस्येला साजरा केला जातो. या वर्षी पोळा हा १४ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. तर आज आपण बैलपोळा या पारंपारिक सणाबद्दल दोन कथा ऐकणार आहोत. यातील पहिली कथा ही भगवान शंकर व पार्वती यांच्याशी निगडित आहे तर दुसरी ही भगवान श्रीकृष्ण यांच्याशी निगडित आहे. चला तर मग पहिल्या कथेपासून सुरुवात करूयात. 'बलिवर्द' या संस्कृत शब्दापासूनच 'बैल' हा शब्द निर्माण झाला. वृषभ, नंदी, बसव, गोपुत्र, कृषिमित्र, शिववाहन या नावाने ज्ञात असलेला बैल प्रत्येक गावातील शिव मंदिरात असतो. या दिवशी शेतकरी बैलाला नदीवर नेऊन आंघोळ घालून, अलंकार घालून मिरवणूक काढतो. घरी आणून पूजा करून पुरणपोळी खाऊ घालतो. या दिवशी बैलाला काम करू दिले जात नाही. कारण एकदा शंकर-पार्वती कैलास पर्वतावर सारीपाट खेळत होते. खेळात शंकर हरले परंतु 'डाव मीच जिंकला' असा दोघात वाद सुरू झाला. याला साक्षीदार नंदी होता पार्वतीने नंदीस डाव कोणी जिंकला असे विचारल्यावर 'डाव शंकराने जिंकला' असे त्यांनी सांगितले. तेव्हा पार्वतीने नंदीस शाप दिला की मृत्यू लोकात तुझ्या मानेवर जू ठेवून काम करून घेतले जाईल. नंदी पार्वतीस शरण आला तेव्हा पार्वतीने जो शेतकरी वर्षभर तुझ्या मानेवर जू ठेवील तो शेतकरी वर्षातून एकदा तुझ्याकडून काम करून न घेता तुला गोड धोड पदार्थ खाऊ घालून तुझी पूजा करेल असं उ:शाप दिला. तेव्हापासून शेतकरी वर्षातून एकदा बैलपोळा साजरा करू लागला. तर बैलपोळा बाबत दुसरी कथा भगवान श्रीकृष्ण यांच्याशी निगडित आहे ती आपण पाहूयात. भगवान विष्णू कान्हाच्या रूपात पृथ्वीवर आले तेव्हा ती कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते. त्यांचा मामा कंस जन्मापासूनच त्यांचा शत्रू होता. कृष्ण तरुण असताना वसुदेव-यशोदेच्या घरी राहत होता तेव्हा कंसाने त्याला मारण्यासाठी अनेक राक्षस पाठवले होते. एकदा कंसाने ओलासुर नावाच्या राक्षसाला पाठवले होते. त्याच्या लिलेमुळे त्यालाही श्रीकृष्णाने मारले होते आणि सर्वांना आश्चर्यचकित केले होते. तो दिवस श्रावण महिन्यातील अमावस्येचा दिवस होता. या दिवसापासून त्याला पोळा नाव असे पडले. अशा या बैलपोळ्याच्या निगडित दोन पारंपारिक कथा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहेत.
बैलपोळा | बैल पोळ्याची गोष्ट | bailpola | bailpola kadhi ahe | bail polyachi gost #bailpola #bendur
बैलपोळ्याच्या निगडित दोन पारंपारिक कथा | bailpola | bail polyachi gost #bailpola #bendur Music Credit: NO COPYRIGHT VIBES
/ @no_copyright_vibes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: