''असा असतो बाबा'' (''अबोली'' प्रकाशन सोहळ्यातील कविता)- प्रज्ञा लोंढे | Pradnya Londhe
Автор: शब्द वल्लरी - Shabd Vallari
Загружено: 2024-04-21
Просмотров: 53146
Описание:
वल्लरी प्रकाशनाच्या वतीने ‘मोगरा’, ‘पारिजात’, ‘चाफा’, ‘बकुळ’, ‘मधुमालती’, ‘जाईजुई‘, ‘निशिगंध’ नंतर मंगळवार, दि. १६ एप्रिल २०२४ रोजी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ‘अबोली’ हा आठवा प्रातिनिधिक काव्यसंग्रह वाचकांच्या ओंजळीत अर्पण केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते माजी संमेलनाध्यक्ष आदरणीय श्री. भारत सासणे सर. तर प्रमुख पाहुण्या म्हणून कादंबरीतील शब्दांप्रमाणे प्रत्यक्ष बोलणाऱ्या ॲड. प्रार्थना सदावर्ते मॅडम, महाराष्ट्रातील नामवंत गझलकार मीना शिंदे मॅडम, महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीतील एक अग्रगण्य नाव असलेल्या वैशाली मोहिते मॅडम आणि वल्लरी प्रकाशनाच्या सल्लागार साहित्यिका-कवयित्री मानसी चिटणीस उपस्थित होत्या. या सर्वांचे ऋण मानावेत तेवढे थोडे आहेत. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रज्ञा कल्याणकर यांनी केले.
सभागृहात निर्माण झालेलं चैतन्य, अतिशय भावपूर्ण आणि आपुलकीचं वातावरण, वेगवेगळ्या शहरांतून आलेले कवी-कवयित्री, त्यांचे नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्रमंडळी… तब्बल अडीच तास चाललेला प्रकाशन, काव्यमहोत्सव आणि सन्मान सोहळा उपस्थितांच्या मन:पटलावर अनेक आनंदस्मृती कोरून गेला. ‘अबोली’मध्ये पुणे येथील तेजल चौधरी, हरिष देशमुख, अंजली देशपांडे, रजनी दुवेदी, वैशाली खराडकर; नंदुरबारवरून गीतांजली खैरनार, बार्शी येथील डॉ. अबोली सुलाखे, प्रा. राहुल पालके, माढा येथील प्रज्ञा लोंढे, मुंबई येथील अंजली पाटोळे, ठाणे येथील अनुराधा नातू आणि सुजाता पाटणकर (सुजाता नवीन), बीड येथील मंदाकिनी क्षीरसागर, नाशिक येथील प्रा. राहुल ठाकरे असे चौदा कवी-कवयित्री सहभागी झाले होते.
बार्शी येथून आलेल्या अकरावीत शिकणाऱ्या प्रज्ञा लोंढे या कवयित्रीने सादर केलेल्या ‘असा असतो बाबा…’ या कवितेनंतर प्रज्ञासह संपूर्ण सभागृहाला अश्रू अनावर झाले. तिच्या आईबाबांसह तिचा सन्मान करण्यात आला.
#marathipoem #bappoem #motivation #marathikavitavachan #fatherpoem #poem #father #बाप
बाबांवरील कविता
असा असतो बाबा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: