रंग बरसे रे कैलासावरी | होळी स्पेशल 2026 | शंकर पार्वती होळी गीत | Har Har Mahadev | Ganesh Vaidya
Автор: Kavya Ganesha - काव्य गणेशा
Загружено: 2026-03-02
Просмотров: 481
Описание:
रंग बरसे रे कैलासावरी 🌸🔥
कैलासावर रंगांची उधळण… शंकर-पार्वतीची दिव्य होळी… डमरू, शंख, ढोल-ताशांचा जल्लोष!
हे पारंपरिक होळी भक्तीगीत खास 2026 साठी सादर करत आहोत.
शिवभक्त, वारकरी, मल्हारी भक्त आणि रामभक्त यांचा रंगोत्सव एका गीतात!
हर हर महादेव 🙏
LYRICS
रंग बरसे रे कैलासावरी
रंग बरसे रे.... रंग बरसे रे कैलासावरी,
रंग बरसे रे कैलासावरी,
होळी खेळे शंकर-पार्वती।
डम डम डम डमरू वाजती,
रंग खेळे रे… होळी खेळे रे…
शंकर-पार्वती!!!
हर हर महादेव… हर हर महादेव!!! ||धृ||
भस्मरंगाची उधळण झाली,
गौरी शिवाच्या प्रेमाने रंगली।
बम बम बम बम बम बम!!!
सृष्टी सारी आज आनंदली,
शिवगण संगती डोलू लागली।
गणपती गुलाल लाल रंग उडवती,
होळी खेळे शंकर-पार्वती॥
रंग बरसे रे कैलासावरी,
रंग खेळे रे… होळी खेळे रे…
शंकर-पार्वती!!! ||१||
पिवळा भंडारा गगनी उधळला,
मल्हारी म्हाळसा बानू सोबतीला।
मल्हारी मार्तंड… जय जय मल्हार!!!
यळकोट यळकोट जय मल्हार बोला,
उमा-शंभू पिवळा पिवळा झाला।
वाघ्या मुरळी गोंधळी ताल धरती,
होळी खेळे शंकर-पार्वती॥
रंग बरसे रे कैलासावरी,
रंग खेळे रे… होळी खेळे रे…
शंकर-पार्वती!!! ||२||
काळा-कळा रंग विठ्ठलाने लावला,
रखमाई संगी गरुडावर आला।
जय हरी… विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल !!!
बुक्का लावीला शिवचरणाला,
शिवलिंग मस्तकी ठेवीला।
वारकरी टाळ-मृदंग वाजवती,
होळी खेळे शंकर-पार्वती॥
रंग बरसे रे कैलासावरी,
रंग खेळे रे… होळी खेळे रे…
शंकर-पार्वती!!! ||३||
वाघावरी बसुनी अंबाबाई आली,
हिरवी साडी गं बाई, हिरवीच चोळी।
उदो… उदो… उदो उदो !!!
हिरवा शालू, हिरवी बांगडी,
पार्वती संग खेळती फुगडी।
उदो उदो संबळी वाजती,
होळी खेळे शंकर-पार्वती॥
रंग बरसे रे कैलासावरी,
रंग खेळे रे… होळी खेळे रे…
शंकर-पार्वती!!! ||४||
केशरी सिंदूर मारोतीने लावला,
श्रीराम-सीतामाईचा लाडका झाला।
जय श्रीराम… जय श्रीराम!!!
जय श्रीराम जय जय श्रीराम बोला,
रामाने रामेश्वर शिवलिंग पुजला।
भक्त सारे हर हर बोलती,
होळी खेळे शंकर-पार्वती॥
रंग बरसे रे कैलासावरी,
रंग खेळे रे… होळी खेळे रे…
शंकर-पार्वती!!!
डम डम डमरु वाजती....
होळी..... रंग...... खेळे..... शंकर... पार्वती..... ||५||
शिवशक्तीचा महिमा अपार,
रंगात आज न्हाला त्रिभुवनसार।
बम बम भोले... बम बम भोले !!!
देव-भक्त सारे एकरूप झाले,
भक्तीसागरी उसळून आले।
गणेश शिवशक्तीला वंदिती,
होळी खेळे शंकर-पार्वती॥
रंग बरसे रे कैलासावरी,
रंग खेळे रे… होळी खेळे रे…
शंकर-पार्वती!!!
डम डम डम डमरू वाजती....
होळी... खेळे शंकर... पार्वती.... ||६||
🎵 गीत माहिती:
🔹 गीतकार – गणेश वैद्य, छत्रपती संभाजीनगर
🔹 संगीत संयोजन – मेघराज
🔹 स्वर – गणेश - अजय
🔹 क्रियटर – SG डिजीटल
📞 Mo. 7972855349
✨ या गीतात:
✔ शंकर-पार्वती होळी
✔ मल्हार भंडारा
✔ विठ्ठल वारकरी रंग
✔ अंबाबाई हिरवा रंग
✔ मारुती केशरी सिंदूर
🙏 व्हिडीओ आवडल्यास:
LIKE 👍
COMMENT 📝
SHARE 🔁
SUBSCRIBE 🔔
@All (Lyrics) Rights Reserved © 03/2026
#HarHarMahadev #HoliSong2026 #ShankarParvati #MahadevSong #MarathiBhaktiGeet #गीतकार_गणेश_वैद्य #गणेश_वैद्य
#गणेश_वैद्य_छत्रपती_संभाजीनगर #holi #holisongs #kavyaganesha #kavya_ganesha
#HarHarMahadev
#Holi2026
#ShankarParvati
#Mahadev
#MarathiSong
#HoliSpecial
#BamBamBhole
#ShivBhajan
#MarathiBhakti
#MahadevSong
#FestivalSong
#MarathiHoli
#DevotionalSong
#SGDigital
#GaneshVaidya
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: