Raju Parulekar । Jayashree Todkar - भारत... एक आजारी देश!!
Автор: The Insider
Загружено: 2023-05-31
Просмотров: 51879
Описание:
भारत हा जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे अथवा नाही याबाबत प्रत्येक जण आपापल्या आकलनशक्तीनुसार व्यक्त होताना दिसत आहे. मात्र या पलिकडे जात एक महत्त्वाची बाब निदर्शनास आली आहे, जी आपल्या देशासाठी चांगली नाही. भारतामध्ये 15-65 वर्षे या वयोगटातील 65 टक्के जनता आहे. मात्र आपण सगळ्यात सर्वात जास्त उत्पादन क्षमता असलेल्या देशांत गणले जात नाही, याचं कारण म्हणजे आपण आजारांनी ग्रासलो आहोत. 2030 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेवर असंसर्गजन्य आजारांमुळे पडणारा भार 3.5 ट्रिलिअन इतका आहे. बॅरीअॅट्रीक सर्जन असलेल्या डॉ.जयश्री तोडकर यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजू परुळेकर यांनी संवाद साधला तेव्हा अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या. आपल्याला माहिती असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने समस्या किती गंभीर बनल्या आहेत याचं ज्वलंत चित्र या मुलाखतीमुळे समाजापुढे येण्यास मदत झाली आहे.
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया [email protected] या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
0:00 Introduction
01:09 बाळसं, लठ्ठपणा आणि समस्या
03:04 फास्ट फूडची समस्या
04:53 आईचे आजार बाळाला
08:09 आधुनिक वैद्यकीयशास्त्राला नावं ठेवणं हा छंद झाला आहे.
10:28 बॉडी मास इंडेक्स ही संकल्पना वैद्यकीय शास्त्र आणि डॉक्टरांनी आणलेली नाही.
12:58 समस्या कशी निर्माण होते?
13:36 बीपी, डायबेटीस , कोलेस्ट्रॉलची घातक युती
16:12 लठ्ठपणाचा आर्थिक परिस्थितीशी संबंध नाही
16:29 चमचमीत खाणे आणि पोट सुटणे
18:08 भारतीय खाण्यातील अडचणी
21:56 प्रथिनं असलेले गोड पदार्थ का आवडतात ?
24:24 सगळं कळतं पण खाल्ल्याशिवाय जमत नाही
25:24 गोड खाल्ल्यावर बरं वाटणं याचा संबंध मानसिकतेशी आहे का शारीरिक परिस्थितीशी?
28:07 ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं काय होतं ?
43:58 रुग्णाने काय करावं ?
47:07 आरोग्य शिक्षणाचा अभाव
52:24 खाद्यपदार्थाच्या कॅलरीची माहिती देणं गरजेचं
54:51 आनंद झाल्यावर जंगी पार्टीची गरज नाही
01:06:17 व्यायामाने वजन कमी होतं का ?
01:13:47 conclusion
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: