छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला? why chhatrapati shivaji maharaj was coronated
Автор: MuktChintan
Загружено: 2021-06-06
Просмотров: 363
Описание:
#chhatrapatishivajimaharaj #rajyabhishek #daivatchhatrapati
छत्रपती शिवाजी महाराज. मरगळलेल्या मनात चेतनेचा संचार करवणारा प्रेरणामंत्र. हा शब्द म्हणजे महाराष्ट्राचा उर्जस्वल इतिहास. मार्गदर्शक वर्तमान आणि दिशादर्शक भविष्य आहे. कितीही नकारात्मक परिस्थितीशी झगडण्याचं बळ देणारा हा मंत्र आहे. छत्रसालपासून ते नेताजी सुभाषबाबूंपर्यंत कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे हे अद्भूत व्यक्तीमत्व. नेताजी एकदा पुण्यात भाषण देताना म्हणाले होते, 'दिल्लीच्या तख्ताविरुद्ध शिवाजी महाराजांनी जो दीर्घकाळ लढा दिला, तो आज आधुनिक भारताला स्वातंत्र्यासाठी लढताना किती प्रेरणादायी ठरतो आहे, याची परक्या लोकांना मुळीच कल्पना करता येणार नाही.'
हा अधिकार अनायासे मिळाला नाही. त्यासाठी आयुष्याचा प्रत्येक श्वास पणाला लावला तेव्हा स्वराज्यसूर्य उगवला महाराष्ट्राच्या अंगणात. स्वराज्याच्या उत्कर्षाची दशोदिशांतून फिरवलेली द्वाही म्हणजे शिवराज्याभिषेक.
हा संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.muktchintan.com/2021/06/w...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: