आळंदीत माऊलींचा जयघोष, संजीवन समाधी सोहळ्याला लाखोंची गर्दी| Alandi Sanjeevan Samadhi Sohala
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-16
Просмотров: 2951
Описание:
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा आळंदीत मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले असून, संपूर्ण नगरी विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहे. प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी माहिती दिली की, 'संत श्रेष्ठ, ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी सोहोळा देवाच्या आळंदी नगरीमध्ये होतोय.' गेल्या सात दिवसांपासून राज्यभरातील कानाकोपऱ्यातून वारकरी मजल-दरमजल करत आळंदीत पोहोचले आहेत. भल्या पहाटे थंडीच्या कडाक्यातही वारकरी पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून माऊलींच्या दर्शनाला जात आहेत. इंद्रायणी घाटापासून ते समाधी मंदिरापर्यंतचा संपूर्ण परिसर आकर्षक सजावटीने आणि वारकऱ्यांच्या मांदियाळीने फुलून गेला आहे.
#SantDnyaneshwar #SanjeevanSamadhi #Alandi #Pune #Warkari #Mauli #Indrayani #KartikiEkadashi #Maharashtra #SaamTV #SaamTVNews #Devotional #Spiritual #Hinduism #Festival #AlandiWari #Bhakti
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: