ओमनाथ नाटेकर यांचा बांद्यात सत्कार
Автор: BANDA PLUS ASHUTOSH BHANGLE
Загружено: 2026-03-10
Просмотров: 244
Описание:
Banda Plus (13.2.26)- कल्याण डोंबिवली येथील भाजप नेते तथा सामाजिक कार्यकर्ते ओमनाथ गजानन नाटेकर यांचा बांदा येथे बांदानगर वैश्यवाणी समाजच्या वतीने सत्कार करण्यात आला. ओमनाथ यांच्या पत्नी आर्या ओमनाथ नाटेकर या कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.या उभयतांचे बांदा शहराशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
बांदा श्री विठ्ठल मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमात आरंभी वैश्य गुरूस्वामी श्री श्री वामनाश्रम स्वामींच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. त्यानंतर बांदा येथिल व्यापारी सुदन केसरकर यांच्या हस्ते शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आले.
या प्रसंगी प्रास्ताविक करताना श्रीप्रसाद वाळके यांनी सांगितले की या दांपत्याची यशस्वी कामगिरी ही बांदा शहरासाठी भूषणावह आहे. त्यांच्या पुढील वाटचालीत आमच्या सदैव शुभेच्छा आहेत.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ओमनाथ नाटेकर म्हणाले की बांदा शहर हे माझे आजोळ आहे. माझे बांद्याशी बालपणापासून ऋणानुबंध आहेत. त्यामुळे हा सत्कार माझा घरचा प्रेमाचा आहे.या निवडणुकीत अर्ज दाखल केल्यानंतर तसेच निवडणूकी दरम्यान विविध घडामोडींमध्ये विविध माध्यमातून बांदावासियांचा मोठा पाठिंबा मिळाला. आपल्या या यशात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा महत्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुदन केसरकर, श्रीप्रसाद वाळके, भाऊ वाळके, साईराज पावसकर, सुधीर शिरसाट, सुनिल वाळके, बाबा काणेकर, दर्पण आळवे, अजिंक्य पावसकर,राजेश पावसकर, नितीन वाळके, पद्मानंद वाळके, संदेश पावसकर आदी उपस्थित होते. स्वागत सुनिल वाळके यांनी तर आभार प्रदर्शन बाबा काणेकर यांनी केले.
Banda Plus
श्री स्वामीराज मिडिया, बांदा
आशुतोष भांगले
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: