‘दादा माणूस’ Dada Manus - Episode 65 पद्मा चव्हाणमुळे झाली दादा कोंडकेंची पंचाईत
Автор: Anitta Padhye Production
Загружено: 2024-02-15
Просмотров: 44783
Описание:
‘दादा माणूस’ Dada Manus
कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके , अवलिया...अलौकिक आणि असामान्य... महाराष्ट्राचा चार्ली चॅप्लीन , सिने रसिकांचं दैवत कॄष्णाष्टमी हा दांदाचा वाढदिवस. दिनांक ६ सप्टेंबरला असलेल्या कॄष्णाष्टमीच्या दिवशी दादांच्या वाढदिवसानिमित्त दादा माणूस’ हा युट्युब चॅनल लेखिका आणि सिने अभ्यासक अनिता पाध्ये यांच्या अनिता पाध्ये प्रॉडक्शन व्दारे आम्ही सुरु करत आहोत. दादा कोंडके हा महाराष्ट्राच्या सिनेसॄष्टीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. या अवलियाने लागोपाठ ९ ज्युबिली चित्रपट देऊन गिनिज बुक रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव नोंदवलं. त्यांचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही मोडलेला नाही. द्वि-अर्थी संवाद म्हणून ज्यांनी दादांची हेटाळणी केली तीचं पांढरपेशी मंडळी हळूच दादांचे चित्रपट बघत असत. परंतु दादा म्हणजे केवळ द्वि अर्थी संवाद म्हणणारा अभिनेता नव्हता. त्यांच्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची-विनोदीची , हजरजवाबी पणाची जातकुळी अनेकांना कळली नाही. आजच्या सिनेमातील , टिव्ही कार्यक्रमातील विनोद ऎकल्यावर-बघितल्यावर दादांच्या विनोदातील हजरजबाबीपणा, बुध्दीमत्ता लक्षात येते. केवळ कोट्या करायच्या म्हणून दादा विनोद करत नसत. त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेसह हिंदी व गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. ’विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्याव्दारे दादा कोंडके महाराष्ट्राला माहिती झाले. सुप्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक भालजी पेंढारकरांच्या ’तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ’सोंगाड्या’ चित्रपटासह ते चित्रपट निर्माता बनले. एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, ह्योच नवरा पाहिजे, बोट लावीन तिथे गुदगुल्या आदि त्यांच्या चित्रपटांना भरपूर यश मिळालं.
संकल्पना व सदारकर्त्या :- अनिता पाध्ये
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: