जय बाबाजी जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांचा जीवनप्रवास पोवाडा |Janardan Swamy (Moungiri) Powada
Автор: baban borde
Загружено: 2020-09-22
Просмотров: 664700
Описание:
" जगाच्या कल्याणा | संताच्या विभूती ||"
सप्रेम जय बाबाजी 🙏
ह्या व्हिडिओ बद्दल कुणाची काहीही तक्रार असल्यास आमच्या यूट्यूब चॅनल टीम सोबत संपर्क करू शकता....
संपर्क -
9404481914
7798072005
E-mail - [email protected]
(व्हिडिओ आवडल्यास जय बाबाजी कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा...)
*********************************************
पोवाडा सादरीकरण आणि निर्मिती ही सर्व शाहीर बाबाजी चे भक्त श्री. परसराम घुसाळे यांचे आहेत. त्यांचा आवाज आणि सादरीकरण अप्रतिम आहे. @babanborde चॅनल ची टीम त्यांच्या भक्तीला आणि आवाजाला सलाम करते।।
जय बाबाजी
शाहीर मो.क्र.9922526339
***********************************************
भारतीय संस्कृतीचा संत आणि दैवी पुरूषांशी अनादी काळापासून संबंध आला आहे. महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे.त्यात एक नाव म्हणजे निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी ( मौनगिरी ) महाराज होय . त्यांचे प्रमुख कार्य श्री क्षेत्र जातेगाव ,वेरूळ, त्र्यंबकेश्वर ,नाशिक ,कोपरगाव , येथे आहे. महाराष्ट्र राज्यात संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यातील संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात दहेगाव म्हणून एक छोटेशे गाव आहे.या गावात मधील अतिशय श्रीमंत अशा उगले पाटील घराण्यात/परिवारात गुरुमाउली जनार्दन स्वामी (मौनगिरी )महाराज यांचा जन्म झाला.गुरुवार दि.२४ सप्टेंबर १९१४ शके १८३६ रोजी सकाळी ७:४५ वा. म्हाळसापोटी भगवान शंकराने निष्काम कर्म योगी जगद्गुरू जनार्दन स्वामी ( मौनगिरी ) महाराज यांच्या रुपात जन्म घेतला. बाबाजींच्या वडिलांचे नाव "श्री आप्पाजी पाटील" व आईचे नाव "मातोश्री म्हाळसादेवी." म्हाळसादेवी ह्या टापरगाव ता.कन्नड येथील मोहिते पाटलांची कन्यारत्न होत्या.
|| उठा कामाला लागा ||
संपूर्ण विश्वाने ,विश्वासाने आणि आदराने नतमस्तक व्हावे अशी अतिशय दिव्य संस्कृती भारतात आहे. आजही असे दिव्य संस्कार ,दिव्य संत महापुरुष ,दिव्यज्ञान आणि दिव्य ग्रंथावली भारतात सहज सुलभतेने प्राप्त होते हि वस्तुस्थिती आहे.त्याच दिव्यसंत परंपरेतील एक अलौकिक अर्वाचीन महर्षी म्हणजेच निष्काम कर्मयोगी भगवान श्री जगद्गुरू सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज. जनसामान्यांना जडवादांच्या जीवनदृष्टीतून जागे करण्याचे महतकार्य जनार्दन स्वामींनी जन्मभर जाणीवपूर्वक जोपासलेले आहेत.दिनांक २४ सप्टेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील पुण्यभूमीत सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या जनार्दन स्वामींचे अंगी श्रद्धा,शुचिता ,अस्मिता,द्या,प्रेम,परोपकर ,क्षमा अशा दैवी गुणांचे दर्शन त्यांच्या बालपणीच्याच आचार -विचारावून सर्वांना समजले होते. स्वामीजींनी प्रथम वारकरी सांप्रदायातील भक्ती प्रेम प्रमेयांची साधना करून अल्पकाळातच पतंजली योग सूत्राचे आधारे योगसिद्ध प्राप्त केली.जटाजूटवल्कलेदारी रुद्राक्ष , भस्म विभूषित अशी त्यागमूर्ती समोर पाहताच पाहणारे नतमस्तक होत.सान्निध्यात येणाऱ्या जनसामान्यांना जीवनसृष्टीत स्वर्गीय सौंदर्य संपन्नता आणि स्वानंद निर्माण करण्याचे प्रेरणादायी सामर्थ्य स्वामीजींचे अंगी होते.
निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांनी सर्व सामान्य लोकांना अध्यात्म परमार्थ शिकवला,सोप्या भाषेत विशेष म्हणजे ग्रामीण भाषेत वेदांताचा अर्थ सांगितला.दिशाहीन समाजाला दिशा दाखविली लहान मुलांना गुरुकुल पध्दतिचे शिक्षण. पडीत नापीक जमिनींची भाविकांकडून श्रमदानाद्वारे जमिनीचे लेवल ,सपाटीकरण करून फुलांच्या फळ्यांच्या बागा फुलविल्या.हजारो शिवमंदिराचे भूमिपूजन केले,गावोगावी,खेडोपाडी ,शहरी विभागात भक्त समवेत जावून प्रवचना द्वारे शिवभक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. कोणत्याही धर्माचा पंथाचा भेद केला नाही.संपूर्ण भारततीर्थ यात्रा केली . आश्रमात,भाविकांसाठी ,विद्यार्थी,वारकरी ,साधू ,संत ,अनाथ यांच्यासाठी मोठ मोठ्या इमारती व वसतिगृह निर्माण केले व स्वत:साध्या झोपडीत राहून जनता जनार्दनाची सेवा केली.सामुदायीक जप ,तप,अनुष्ठान ,यज्ञ ,पारायण , भजन आणि भोजन असा आग्रह असणाऱ्या स्वामीजींनी जनसामान्यांना अपार आनंदाचा आणि मौलिक मुल्यांचा सुलभतेणे लाभ करून दिला.
भारतीय संस्कृतीचा संत आणि दैवी पुरुषांशी अनादी कालापासून संबंध आहे.भारतीय इतिहासाची पाने ह्या मानवजातीच्या रक्षण कर्त्यांच्या स्तुतीने व आळवनीने भरलेली आहेत. महाराष्ट्रात फार मोठी संत परंपरा लाभली आहे. त्यात प्रामुख्याने संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर ,संत एकनाथ ,संत रामदास स्वामी ,स्वामी गजानन महाराज,साईबाबा हे तर त्या परंपरेतील भूषण आहेत. ह्याच परंपरेतील दुसरे नाव म्हणजे जगद्गुरू जनार्दन स्वामी ( मौनगिरी )महाराज होय. श्री संत जनार्दन स्वामी वयाचे १७-१८ व्या वर्षी असतांना आईचे महानिर्वाण झाल्यानंतर श्री क्षेत्र अंदरसूलला १९४८ ते १९६४ या दरम्यान नागेश्वर शिवमंदिरात एक कप दुध व एक लवंग यावर सिद्धासनात 18/18 तास 16 वर्ष तपश्चर्या केली.वेद ,पुराण,गीता ,भागवत सर्व ग्रंथाचे अध्ययन व हटयोग,ध्यानयोग, करून श्री सदशिवाच्या साक्षात्कारापर्यंत उच्च स्थिती प्राप्त करून घेतली.श्री महामृत्युंजय भगवान शंकराच्या आदेशाने मग त्यानी जातेगाव येथील श्री पिनाकेशवर महादेव या जीर्ण शिवालयाचा जीर्णोद्धार केला.त्या ठिकाणी त्यांचे अनेक लीला साक्षात्कार ,जनतेला पाहण्यास मिळाले.बाबाजी हे दिव्य ईश्वर विभूती आहेत अशी अनेकांना अनुभूती आली.त्यानंतर फार मोठा लोकसंग्रह श्री बाबाजींच्या कृपाशिर्वादाने त्याठिकाणी प्राप्त झाला.
#जय_बाबाजी_Baban_Borde_YouTube_Channel_Team
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: