🌿 कोथिंबीर वडी | Traditional Maharashtrian Coriander Fritters
Автор: swadsutrabysakshi
Загружено: 2025-07-30
Просмотров: 502
Описание:
🌿 कोथिंबीर वडी | Traditional Maharashtrian Coriander Fritters
📝 साहित्य (Ingredients):
• ताजी कोथिंबीर – 200 ग्रॅम (छान बारीक चिरलेली)
• हिरव्या मिरच्या – 3
• लसूण – 5 ते 7 पाकळ्या
• धणे – 1 टेबलस्पून
• मीठ – ½ टीस्पून (ठेचासाठी) + चवीनुसार
• बेसन – 2 कप
• तांदळाचे पीठ – 1 कप
• तीळ – 1 टेबलस्पून
• जिरे – 1 टेबलस्पून
• हळद – ½ टीस्पून
• धणे पूड – ½ टीस्पून
• गरम मसाला – ½ टीस्पून
• हिंग – ½ टीस्पून
• लाल तिखट – 1 टीस्पून
• खसखस – 1 टीस्पून
• पाणी – आवश्यकतेनुसार
• तेल – वाफवण्यासाठी व तळण्यासाठी
👩🏻🍳 कृती (Method):
1️⃣ ठेचा तयार करा
लसूण, हिरव्या मिरच्या, धणे आणि अर्धा टीस्पून मीठ एकत्र करून मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात बारीक वाटून ठेचा तयार करा.
2️⃣ कोथिंबीर प्रक्रिया
कोथिंबीर बारीक चिरून घ्या. स्वच्छ पाण्याने धुवून सुकवून बाजूला ठेवा.
3️⃣ सारण/पीठ तयार करा
एका मोठ्या बाउलमध्ये कोथिंबीर, बेसन, तांदळाचे पीठ, तयार ठेचा, तीळ, जिरे, हळद, धणेपूड, गरम मसाला, हिंग, लाल तिखट, खसखस आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मिश्रण नीट एकजीव करून घ्या.
थोडं-थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या. नंतर थोडं तेल टाकून पीठ मऊसर व एकसंध करा.
4️⃣ वाफवणे
एका वाफवण्यासाठीच्या पात्राला (थाळी किंवा डब्बा) तेल लावून त्यावर थोडे तीळ आणि खसखस पसरवा, त्यात तयार मिश्रण समसमान पसरवा. वरून थोडे तीळ आणि खसखस घालून सजवा.
झाकण ठेवून मध्यम आचेवर 15 मिनिटं वाफवून घ्या. थंड झाल्यावर चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये वड्या कापा.
5️⃣ तळणे
तयार वड्या गरम तेलात मंद आचेवर तळून घ्या, जोपर्यंत त्या खमंग आणि कुरकुरीत होत नाहीत.
गरमागरम कोथिंबीर वड्या लसूण चटणी, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सौससोबत सर्व्ह करा.
#kothimbirvadi #swadsutra_sakshi #shorts #instareels #quickrecipe #shravan #viralvideoshorts #trendingshorts #trendingsong #youtubeshorts
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: