आले पिकावरील करपा रोग नियंत्रण आले (आद्रक) लागवड
Автор: Agrowone.com.Marathi
Загружено: 2019-09-23
Просмотров: 29023
Описание:
आले पिकावरील करपा रोग नियंत्रण आले (आद्रक) लागवड वनस्पतींची कोवळी पाने, फुले व नवीन वाढणारे अंकुर यांवर वाढणार्या कवक( बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती), सूक्ष्मजंतू व व्हायरस यांमुळे होणार्या रोगांनी ते भाग सुकतात. त्यांचा रंग तपकिरी काळसर होऊन ते उष्णतेने करपल्यासारखे दिसतात म्हणून हे लक्षण दिसणार्या रोगास करपा असे नाव आहे. याला अंगमारी, खार अशीही नावे आहेत. रोगट भाग सडल्याचे दिसत नाही. रोग जास्त बळावल्यास संपूर्ण झाडे सुकतात व मरतात. उदा. , पाश्चिमात्य देशांत चेस्टनटची झाडे कवकामुळे (एंडोथियापॅरासिटिका) करपा रोग पडून मरतात. सफरचंदाच्या मोहोरावर आग्या करपा रोग पडून तो सुकतो. हरभरा , द्राक्ष , भात , बटाटा इ. पिकांवर करपा रोग पडून पिकांचे अतिशय नुकसान होते. करपा रोगाचा प्रसार पाऊस , वारा , कीटक तसेच रोगग्रस्त बियाणे यांच्याद्वारे होतो.
विविध वनस्पतींवरील करपा रोग :(१) घेवड्यावरील करपा, (आ) सफरचंदाच्या पानावरील आग्या करपा, (इ) अक्रोडावरील करपा, (ई) बटाट्याच्या पानावरील करपा. करपा कीड : (१)अळी, (२)कोष, (३)प्रौढ भुंगेरा.
.*DOWNLOAD APP --- https://play.google.com/store/apps/de...
WHATSAPP https://wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE https://agrowone.in/
📞📞 https://wa.me/919172800247 #आले_लागवड
बहुतांशी करपा रोग अपूर्ण कवक ( फंजाय इंपरफेक्टाय) वर्गातील मोनिलिएलीझ , मेलँकोनिएलीझ व स्फिरॉडिएलीझ या गणांतील कवकांमुळे तसेच झँथोमोनसवएर्विनियाया प्रकारच्या सूक्ष्मजंतूंमुळे व काही व्हायरसांमुळे होतो.
लक्षणे
कोवळ्या पानांवर बारीक बारीक ठिपके दिसू लागतात. ते तेलकट काळ्या रंगाचे असतात. त्यांच्या कडा तांबूस दिसतात व मध्यभागी ते खोलगट असतात. उदा. , द्राक्षावरील करपा. कित्येक वेळा रोगग्रस्त पाने रंगाने तपकिरी होतात व ती वाळलेल्या गवतासारखी शुष्क होतात. उदा. , भातावरील आणि चवळीच्या पानांवरील करपा. कोवळ्या अंकुरावर तसेच फांद्यावर ⇨स्थूलकोनोतकाच्या कोशिकांचा (पेशींचा) नाश होऊन काळे , खोलगट व्रण पडतात. उदा. , द्राक्षाचा करपा. फुलांवरही करपा रोग पडतो व त्यामुळे ती करपतात.उदा. , शेवंती , गाजर इत्यादी. #ॲग्रोवन , ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/de...
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक - / agrowone
📸 इंस्टाग्राम - / agrowone
ट्विटर - / agrowone
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: