Usha's Recipes - #3 Aloo Corn Frankie - आलू कॉर्न फ्रँकी
Автор: Usha's Recipes
Загружено: 2020-08-19
Просмотров: 739
Описание:
Welcome to Usha's Recipes.
If you have not already done then please like, share, and subscribe to this channel.
आलू कॉर्न फ्रँकी:
फ्रँकी साठी साहित्य: दीड कप मैदा, दीड कप कणिक, मीठ, ओवा पुड 1 चमचा, जिरे पुड 1 चमचा, मॅगी मसाला 1 चमचा, 2 चमचे तेल, पाणी गरजेप्रमाणे.
सारण तयार करण्यासाठी साहित्य: बटाटे 3-4 मोठे, कांदा 1 मोठा, सिमला मिरची 1 मोठी, स्वीटकॉर्न 1 कप, टोमॅटो केचअप, रेड चिली सॉस, धणे पुड 1 चमचा, जिरे पुड 1 चमचा, आमचूर पावडर 1 चमचा, तिखट अर्धा चमचा, हळद, हिंग, मीठ, बारीक शेव.
फ्रँकी मसाला तयार करण्यासाठी साहित्य व कृती: हळद 1 चमचा, तिखट 2 चमचे, धणे पुड 1 चमचा, जिरे पुड 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, आमचूर पावडर 1 चमचा, काळे मीठ 1 चमचा, चॅट मसाला 1 चमचा. हे सर्व साहित्य एकत्र करून हवाबंद बाटलीत भरून ठेवावे.म्हणजे गरजे प्रमाणे वापरता येते.
पीठ भिजविण्याची कृती: मैदा व कणिक एकत्र करून त्यात ओवा पुड,जिरे पुड,मॅगी मसाला,मीठ व तेल घालावे. नंतर भिजवून घ्यावे. भिजविलेले पीठ 1 तास झाकून ठेवावे.
सारण तयार करण्याची कृती: बटाटे उकडून कुसकरून घ्यावेत. कढईत 3-4 चमचे तेल टाकावे. मग त्यात बारीक चिरलेला कांदा व सिमला मिरची टाकावी. कांदा सोनेरी झाल्यावर त्यात कुसकरलेला बटाटा टाकावा. ते एकत्र कालवून घ्यावे. टोमॅटो केचअप, रेड चिली सॉस, धणे पुड, जिरे पुड, आमचूर पावडर, तिखट,हळद,हिंग,गरम मसाला टाकावा. नंतर त्यात वाफवून गार केलेले स्वीटकॉर्न टाकावेत. सर्व मिश्रण कालवून आवडत असल्यास त्यामध्ये ताजी कोथिंबिर घालावी व सारण गार करण्यास ठेवावे.
फ्रँकी तयार करण्याची कृती :- भिजविलेल्या कणिक च्या पोळ्या लाटून अर्धवट भाजून ठेवाव्यात. अर्धवट भाजलेल्या या पोळ्या झाकून ठेवाव्यात म्हणजे त्या कडक होत नाहीत. अर्धवट भाजलेल्या पोळीला तेल लावून तव्यावर भाजावी. दोन्हीकडून पोळी नीट भाजल्यानंतर पोळी खाली उतरवून पोळीवर फ्रँकी मसाला टाकावा. सारणाची भाजी लावावी. त्यावर बारीक शेव टाकावी व त्याची गुंडाळी तयार करावी.
अशा रितीने आपली आलू कॉर्न फ्रँकी खाण्यासाठी तयार.
The simplest way to make a very tasty and delicious dish, Aloo Corn Frankie.
Please watch the video and try it at your home and let me know your views in the comments.
Don't forget to like, share, and subscribe to this channel to get simple but very delicious recipes.
Thank you
#recipes #kitchen #aloo #corn #frankie #roll #dishes #indiandish #chinese #ushasrecipes #lunch #dinner #aloocronfrankie #tasty #delicious #mouthwatering #yummy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: