बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा वारसा आणि शिंदे साहेबांचा विकासाचा संकल्प | शिवसेना दसरा मेळावा 🚩
Автор: Pratap Sarnaik
Загружено: 2025-10-06
Просмотров: 51
Описание:
बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा वारसा आणि शिंदे साहेबांचा विकासाचा संकल्प 🚩
हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा पुढे नेत, शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नेस्को सेंटर येथे शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा उत्साहात पार पडला.
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त बळीराजाला महायुती सरकार खंबीरपणे पाठिंबा देत असून, दिवाळीपूर्वी मदत मिळेल असे शिंदे साहेबांनी आश्वासन दिले.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने आपले लक्ष केंद्रीत करावे, असा सल्लाही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिला. या मेळाव्यादरम्यान त्यांनी लाखो शिवसैनिकांच्या जयघोषात जनतेला मार्गदर्शन करताना बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्याचा आणि जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सोहळ्यात शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि प्रचंड उत्साह निर्माण झाला.
#EknathShinde #PratapSarnaik #ShivSena #DasaraMelava #दसरामेळावा
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: